'अजित' मार्गावर यावेच लागते भावा'; वसंत मोरेंचा व्हिडिओही शेअर केला, रुपाली पाटलांची पोस्ट चर्चेत

By मुकेश चव्हाण | Published: December 5, 2022 05:54 PM2022-12-05T17:54:44+5:302022-12-05T17:56:22+5:30

वसंत मोरेंच्या या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

After MNS Leader Vasant More's displeasure, NCP leader Rupali Patil has posted on Facebook. | 'अजित' मार्गावर यावेच लागते भावा'; वसंत मोरेंचा व्हिडिओही शेअर केला, रुपाली पाटलांची पोस्ट चर्चेत

'अजित' मार्गावर यावेच लागते भावा'; वसंत मोरेंचा व्हिडिओही शेअर केला, रुपाली पाटलांची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

मनसेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. अजित पवारांच्या या ऑफरनंतर वसंत मोरे लवकरच मनसे पक्ष सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

वसंत मोरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पुणे शहरातील पक्षामधून मला डावलंल जातंय. मला लक्ष्य केलं जातंय. मला पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. तरीसुद्धा मी कार्यक्रमाला जातो. मला स्टेजवर बसवलं जातं, मात्र भाषणासाठी वेळ दिला जात नाही. या सगळ्या गोष्टी मी मनसेप्रमुखराज ठाकरे यांना सांगितल्या आहेत. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की, पुण्यात आल्यानंतर एक बैठक घेऊ आणि काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली.

आगामी निवडणुकीत नवीन झेंडा हातात घेणार?; वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं, पक्षनेतृत्वावरही बोलले!

वसंत मोरेंच्या या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे रुपाली पाटील यांनी अजित पवार आणि वसंत मोरे यांच्या लग्नातील भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच १६ वर्षें राजकारणात काम करून, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उगीच प्रवेश केला नाही. अजितदादा यांचे दमदार नेतृत्व, वडीलधारी बंधू म्हणून असलेला आधार, प्रशासकीय कामाचा तडाका असल्याने अजित मार्गावर यावेच लागते भावा, असं रुपाली पाटील यांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.

तत्तपूर्वी सध्या मी मनसे पक्षातच आहे. आगामी निवडणुकी जवळ येताय. त्यावेळी वसंत मोरे कुठे असतील, असा प्रश्न वसंत तात्यांना विचारला असता, मी सध्या कुठल्याही वाटेवर नाही. परंतु पक्षनेतृत्व आणि पक्ष याच्यावर मी नाराज नाही. मात्र पुण्यातील जी कार्यकारणी आहे, ती मला वारंवार डावलतेय. माझी कामे आणि सामान्या लोकांमधील असलेली प्रसिद्धी या लोकांना बघवत नाही, असं म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला घराचा आहेर दिला. तसेच राज ठाकरेंना वारंवार सांगूनही मला टाळण्यात येतंय. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळी मला वाटलं राज ठाकरे पुण्यातील नेत्यांना काहीतरी बोलतील, मात्र असं काहीच झालं नाही, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मी मनसेतून गेल्यास पक्षाला फरक पडेल, परंतु इथल्या स्थानिक नेत्यांना आनंद होईल, असा दावा देखील वसंत मोरे यांनी केला आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली होती. मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे मनसेवर नाराज असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र वसंत मोरे आणि संजय राऊतांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. संजय राऊतांनी वसंत मोरेंच्या कामाचं कौतुक केलं होतं. त्यामुळे वसंत मोरे शिवबंधन बांधणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला होता. वसंत मोरेंना राऊतांनी 'तात्या' म्हणून हाक देखील मारली होती. मात्र त्यानंतरही वसंत मोरे यांनी पक्ष सोडणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. दोन्ही पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांकडून ऑफर आल्या आहेत. मात्र वसंत मोरे त्यांच्या मनसे न सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसत आहे. 

निलेश लंके यांनीही दिली ऑफर-

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासंदर्भात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी त्याला विरोध केला होता.राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी आमदार निलेश लंके यांची भेट झाली होती. वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसनेही यापूर्वी पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: After MNS Leader Vasant More's displeasure, NCP leader Rupali Patil has posted on Facebook.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.