शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन बलात्कार करणाऱ्या वसईच्या भोंदू ऋषीकेशला पिंपरीत बेड्या, अत्याचार करुन पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 06:35 IST

भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरीतून शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली.

पुणे : दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करून महिलेवर अत्याचार करून पसार झालेला वसईतील भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरीतून शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्याविरोधात ३५ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली होती.

पीडित महिला मूळची पुण्यातील रहिवासी आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये तिची भोंदू ऋषीकेश याच्याशी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. त्यानंतर त्याने तिला फसवणुकीच्या जाळ्यात ओढले. ‘माझ्यात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवितो,’ अशी बतावणी त्याने महिलेकडे केली. तो २०२३ मध्ये पुण्यात आला. त्याने पीडित महिलेची मांजरी परिसरात भेट घेतली. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला पुन्हा वसईला बोलावले. वसईतही तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे.

भोंदू खरात प्रकरणानंतर पीडिता तक्रार करण्यास पुढे आल्याने गुन्हा उघडकीस ­

नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर पुण्यातील पीडित महिलेने पाेलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाची माहिती तिने पोलिसांना दिली. 

सुरुवातीला तिने वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वसई पोलिसांनी संंबंधित गुन्हा तपासासाठी पुण्यातील हडपसर भागात मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग केला. 

भोंदू ऋषीकेश हा पिंपरी परिसरात असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Vasai Fake Godman Arrested in Pimpri for Rape After Drugging Victim

Web Summary : A fake godman from Vasai, Rishikesh, was arrested in Pimpri for allegedly raping a woman after drugging her. He befriended the victim on social media and lured her with promises of divine teachings before committing the crime. The arrest followed a complaint filed after a similar case came to light.
टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी