अजित पवारांच्या वाढदिवशी विविध उपक्रम

By Admin | Updated: July 23, 2014 23:26 IST2014-07-23T23:26:12+5:302014-07-23T23:26:12+5:30

अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. येथील सिटी प्राईड या संकुलात खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

Various enterprises on Ajit Pawar's birthday | अजित पवारांच्या वाढदिवशी विविध उपक्रम

अजित पवारांच्या वाढदिवशी विविध उपक्रम

दौंड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. येथील सिटी प्राईड या संकुलात खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. 
या वेळी भीमा पाटसचे उपाध्यक्ष सत्वशील शितोळे, दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे, महानंदाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, अॅड. अजित बलदोटा, मनीषा लव्हे, महेश 
भागवत, नागसेन धेंडे, हरेष 
रांभिया, सुभाष नागवे, बबिता 
महाले, सीमा पाटोळे, अरुणा 
डहाळे, अंकुशा शिंदे, योगीनी दिवेकर, हनुमंत भागवत उपस्थित होते. 
त्यानंतर येथील भीमथडी 
शिक्षण संस्थेत शालेय विद्याथ्र्याना आमदार रमेश थोरात, नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या. 
महानंदाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या वतीने गेल्या चार वर्षापासून तालुक्यात मोफत वह्या वाटप करण्यात येतात. या वेळी गणोश पवार, हरिभाऊ ठोंबरे उपस्थित होते. तसेच, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस व वीरधवल जगदाळे युवामंच यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 1क्1 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. 
या वेळी इंद्रजित जगदाळे, अनिल साळवे, राजेश गायकवाड, ज्ञानेश्वर मुळे, आनंद बगाडे, उमेश जगदाळे, विशाल भापकर, सुधीर शितोळे, मयूर खेडगीकर, राहुल क्षीरसागर, गौरव सरनोत, निखिल ओझा, अविनाश जगदाळे उपस्थित होते. आयुष ब्लड बँकेचे सोमनाथ सोनवणो यांचे या शिबिराला सहकार्य मिळाले. त्यानंतर येथील निगरुण दत्त मंदिराजवळ अजितदादा पवार मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या वतीने मोफत धान्य वाटप करण्यात आले. गहू, साखर, तांदूळ प्रत्येक व्यक्तीला वाटप करण्यात आले. या वेळी राजेश पाटील, रोहित पाटील, अण्णा जगताप, दिलीप डहाळे, दिलीप जाधव, सुरेश सकट, उमेश कांचन उपस्थित होते. तसेच येथील ल. ब. अगरवाल शाळेत विद्याथ्र्याना वह्यांचे वाटप करण्यात आले. प्राचार्य प्रकाश सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. (वार्ताहर)
 
एकवीस हजार वह्यांचे मोफत वाटप
4दौंड तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या वतीने तालुक्यातील विविध शाळांमध्ये 21 हजार वह्यांचे वाटप करण्यात आल्यामुळे विद्याथ्र्यात समाधान व्यक्त केले जात आहे. 
4दौंड येथील अगरवाल शाळेतील विद्यार्थिनी सुनयना मोहितेचा आज वाढदिवस होता. तेव्हा, वैशाली नागवडे यांनी केक आणला. दरम्यान, हा केक या मुलीच्या हस्ते कापला, तेव्हा विद्याथ्र्यामध्ये आनंदाचे वातावरण होते.

 

Web Title: Various enterprises on Ajit Pawar's birthday