५ हजारांची लाच घेताना वरसगावच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 01:08 PM2024-03-29T13:08:42+5:302024-03-29T13:08:57+5:30

मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदीत दुरुस्त करुन देण्यासाठी ग्रामसेवकाने ५ हजारांची लाच मागितली

Varasgaon Gram Sevak was caught red handed by Anti Bribery Department while accepting a bribe of Rs. | ५ हजारांची लाच घेताना वरसगावच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

५ हजारांची लाच घेताना वरसगावच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

वेल्हे : पाच हजार रुपयांची लाच घेताना वरसगावच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विठ्ठल वामन घाडगे (वय ४४, रा. वरसगाव, ता.राजगड) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे.

तक्रारदार यांचे वरसगाव येथे वडिलोपार्जित घर आहे. या मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदीत दुरुस्त करुन घराच्या ८ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव दुरुस्ती व त्यांच्या आईचे नाव लावण्यासाठी ग्रामपंचायतीत अर्ज केला होता. ग्रामसेवक विठ्ठल घाडगे याने त्यांच्याकडे ५ हजारांची लाच मागितली. त्याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीची पडताळणी बुधवारी करण्यात आली. कर्वेनगर येथील मातोश्री वृद्धाश्रमाचे जवळ घाडगे याने बोलावले. तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घाडगे याला पकडले. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title: Varasgaon Gram Sevak was caught red handed by Anti Bribery Department while accepting a bribe of Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.