संस्काराची मूल्ये लहान वयात रुजणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST2021-02-05T05:16:46+5:302021-02-05T05:16:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘मोबाईलने लहान मुलांचे विश्व विस्कळीत केले आहे. गोष्टींच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ...

The values of the sacrament must be inculcated at an early age | संस्काराची मूल्ये लहान वयात रुजणे आवश्यक

संस्काराची मूल्ये लहान वयात रुजणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘मोबाईलने लहान मुलांचे विश्व विस्कळीत केले आहे. गोष्टींच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण होते. लहान मुलांना देण्यात येणाऱ्या शिक्षणातून भावनांचा, अंत:करणाचा विकास व्हायला हवा. त्यामुळे संस्काराची मूल्ये लहान वयात रुजणे आवश्यक आहे’, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी व्यक्त केले.

प्रतिभा लष्करे लिखित ‘सुरस कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांच्या हस्ते मित्रमंडळ कॉलनीजवळील महालक्ष्मी सभागृह येथे केले होते. या वेळी लेखिका प्रतिभा लष्करे, तुषार लष्करे उपस्थित होते.

पंडित म्हणाले, ‘आजकाल मोबाईल, लॅपटॉप या माध्यमातून गोष्टी ऐकायला आणि पहायला मिळतात. तो एक चांगला अनुभव असतो. परंतु आई, बाबा, आजी यांच्या तोंडून गोष्टी ऐकणे हा जिवंत अनुभव आहे. यूट्यूबपेक्षा प्रत्यक्ष गोष्टी सांगण्यावर भर असायला हवा. मुलांसोबत संवाद ठेवायला हवा.’

प्रतिभा लष्करे यांनी मनोगत व्यक्त केले. तन्वी लष्करे आणि रोहित चांदोरीकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: The values of the sacrament must be inculcated at an early age