Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:53 IST2025-05-22T14:52:08+5:302025-05-22T14:53:38+5:30

Vaishnavi Hagwane : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर आता हगवणे यांची मोठी सून मयुरी जगताप यांनीही गंभीर आरोप केले आहेत.

Vaishnavi Hagwane case Vaishnavi's husband Shashank also beat up his sister-in-law; Mayuri's brother showed CCTV footage | Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले

Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले

Vaishnavi Hagwane :  वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. दरम्यान, आता हगवणे कुटुंबीयांच्या मोठ्या सुनेनेही गंभीर आरोप केले आहेत. 

हगवणे कुटुंबीयांची मोठी सून मयुरी जगताप यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली.  या मुलाखतीमध्ये त्यांनी गंभीर आरोप केले असून मयुरी जगताप यांच्या भावाने मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले आहेत. वैष्णवीचा नवरा शशांककडून हगवणे यांची मोठी सून मयुरीला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.

असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार

यावेळी मयुरी जगताप यांच्या भावाने गंभीर आरोप केले. मयुरीचा भाऊ म्हणाला, वैष्णवीच्या बाबतीत अगोदर कल्पना नव्हती. पण सगळ्यात पहिले माझ्या बहिणी सोबत या गोष्टी चालू झाल्या. आम्ही प्रत्येक वेळेस मयुरीला साथ देखील दिली. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे जाणे, मीटिंग बसवणे, कुठे काय कोणाचं चुकत असेल तर समजावून सांगणे. या गोष्टी वारंवार होत होत्या. दोन वेळेस आपण त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पण पोलिसांकडे गेल्यावर त्यांच्या इथले गावातले कोणीतरी ओळखीचे लोक येऊन मध्यस्थी करायचे. पण त्यांची सुधारायची मानसिकता नव्हती, असंही मयुरीच्या भावाने आरोप केले.

"तिसऱ्या वेळेस मयुरीचा रात्री कॉल आला आणि तिने मला मारहाण केल्याचे सांगितले. त्यावेळेस आम्ही पोलीस ठाण्यात गेलो तर आमच्यात आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. शशांक हगवणे यांनीही मारहाण केली. माझा मोबाईल घेऊन शशांक पळून जातानाचे आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत.डण सुरू होते ते त्यावेळेस बहिणीने लाईव्ह वगैरे केले होते, यावेळी मयुरीच्या भावाने सीसीटीव्ही फुटेज दाखवले आहेत. 

Web Title: Vaishnavi Hagwane case Vaishnavi's husband Shashank also beat up his sister-in-law; Mayuri's brother showed CCTV footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.