Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 19:03 IST2025-05-22T19:01:46+5:302025-05-22T19:03:45+5:30
Vaishnavi Hagawane News: सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणाने राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात आता एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव अंजली दमानिया आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी घेतले आहे.

Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
Vaishnavi Hagawane Jalindar Supekar Latest News: पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणेमृत्यू प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याचेही नाव घेण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबर पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत. दमानियांनी त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या आरोपांवर सुपेकरांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, "जालिंदर सुपेकर नावाचे ते मुलाचे (शशांक हगवणकर) मामा आहे. त्यांचा धाक दाखवून त्यांच्यावर (सूनांवर) बरंचस काही करायचे. त्यांच्या कुटुंबांना धाक दाखवायचे. त्या दोन्ही मुलींना धाक दाखवायचे."
वाचा >>वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
"मयुरीने (राजेंद्र हगवणेच्या मोठ्या मुलाची पत्नी) जेव्हा तक्रार केली होती, तेव्हा तक्रारीवर सुद्धा हे लोक फरार होते. मग परत आले. त्यांना (मयुरीच्या कुटुंबाला)धमकावण्यात आलं की तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की, जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी झाली पाहिजे", अशी मागणी अंजली दमानियांनी गंभीर आरोप करताना केली.
त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही सुपेकर यांचे नाव घेत आरोप केला आहे.
"सुपेकर हे त्यांचे (शशांक हगवणेचा) मामा आहेत. केलं सुपेकराचं. घेणं न देणं त्रास दिला", असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.
पोलीस महानिरीक्षक सुपेकरांनी आरोप फेटाळले
अंजली दमानिया आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुपेकर यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप केले. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक जालिदर सुपेकर यांनी खुलासा केला आहे.
"माझा या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध नाही. सहा महिने झाले हगवणे कुटुंबीयांशी भेट झालेली नाही. हगवणे कुटुंबीय माझे लांबचे नातेवाईक आहेत", असा खुलासा करत पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.