शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 21:05 IST

Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं असून, पत्नी, सासू, नणंद यांना एक दिवसाची तर सासरा दीराला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Vaishnavi Hagawane Death Case :  वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले. दरम्यान, न्यायालयाने पत्नी, सासू, नणंद यांना एक दिवसाची तर सासरा दीराला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज न्यायालयात झालेल्या सुनावणील हगवणे यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत चॅट सापडल्याचा मोठा दावा केला. दरम्यान,आता या दाव्यावर वैष्णवीच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली. 

वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद

वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट आणि काका मोहन कस्पाटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मोहन कस्पाटे म्हणाले, आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे. पोलिस योग्य पद्धतींनी तपास करत आहेत. पोलिस तपास करुन निर्णय घेतील. ते जे आरोप करत आहेत त्यात काही तथ्य नाही, हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात. त्याचा मी जाहीर निषेध करत आहे, असंही ते म्हणाले. 

"मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे. आम्ही साक्षीदार आहे स्वतः त्यांनी सोनं, गाडी भीक मागून घेतली. हे मागूनच घेतली म्हणजे लग्नाची जी बैठक झाली होती. त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की, चाळीस लाखाची फॉर्च्युनर काय करायची आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. त्यांच्याकडे पाच कोटींची कुठली गाडी नाही. ती गाडी ओढून नेली होती असं ऐकलं होतं, आम्ही त्यावेळेला आमच्या भावाने मदत करून ती गाडी पुन्हा आणलेली आहे, असा दावाही त्यांनी केला.

"त्यांनी केलेल्या आरोपाचा पोलिस योग्य तपास करतील. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी किती शिंतोडे उडवले तरी त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही, आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे, असंही वैष्णवीचे काका म्हणाले.

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस