महापालिकेच्या ८३ केंद्रांवर लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:09 IST2021-06-17T04:09:20+5:302021-06-17T04:09:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या ५३ केंद्रांवर गुरुवारी कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस ...

Vaccines available at 83 NMC centers | महापालिकेच्या ८३ केंद्रांवर लस उपलब्ध

महापालिकेच्या ८३ केंद्रांवर लस उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेच्या ५३ केंद्रांवर गुरुवारी कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार: लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेल्या १०० डोसपैकी ४० टक्के कोविशिल्ड लस व ६० टक्के कोव्हॅक्सिन लस या ऑनलाईन अपॉईन्मेंट /स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिला जाणार आहेत.

लसीकरणाकरिता बुकिंगसाठी गुरुवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. कोविशिल्ड लसीच्या साठ्यापैकी ४० टक्के लस ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी (२५ मार्च पूर्वी) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच उर्वरित २० टक्के लस ही हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़

-----

१८ मेपूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस

ज्या नागरिकांनी १९ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना बुधवारी १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. यातील ६० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही ऑनस्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.

----

Web Title: Vaccines available at 83 NMC centers