शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांचे संकेतस्थळ होणार अपडेट

By admin | Updated: July 4, 2015 00:19 IST

विद्यापीठ, महाविद्यालये व संस्थांच्या संकेतस्थळ यापुढे अपडेट राहणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) याबाबत देशभरातील विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत.

पुणे : विद्यापीठ, महाविद्यालये व संस्थांच्या संकेतस्थळ यापुढे अपडेट राहणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) याबाबत देशभरातील विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांतील सुविधा, अभ्यासक्रम, संशोधन, शिष्यवृत्ती, रँकिंग, शिक्षक, प्लेसमेंट अशा परिपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे यूजीसीने सांगितले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी यूजीसीने हे पाऊल उचलले आहे.विद्यापीठ तसेच महाविद्यालय स्तरावर प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. सध्या सर्वच विद्यापीठे, महाविद्यालये तसेच खासगी शैक्षणिक संस्थांचे संकेतस्थळ आहेत. या संकेतस्थळावर तेथील अभ्यासक्रम, वसतिगृह, विविध उपक्रम यांची माहिती प्रामुख्याने दिसते. मात्र, इतर माहितीची बहुतेक महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर वानवाच दिसते. विद्यार्थी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेताना संकेतस्थळावर त्या महाविद्यालयाची माहिती घेतात. मात्र, अपुऱ्या माहितीमुळे संभ्रम निर्माण होतो. तसेच महाविद्यालयातूनही अनेकदा पुरेशी माहिती मिळत नाही. त्यामुळे ऐकीव माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना संंबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. त्यातून नंतर अडचणी आल्याचे अनेक प्रकार समोर आले. याअनुषंगाने यूजीसीने सर्व विद्यापीठांना संकेतस्थळ अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.(प्रतिनिधी)विद्यार्थी व त्यांच्या पालकांना संस्थेशी संबंधित सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, असे यूजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामध्ये चालू प्रवेशप्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती, अभ्यासक्रमनिहाय प्रवेशक्षमता अपेक्षित आहे. तसेच अभ्यासक्रमनिहाय शुल्करचना, विषयनिहाय शिक्षकांची माहिती, विविध उपक्रमांचे वेळापत्रक, शैक्षणिक वेळापत्रक, विद्यार्थीकेंद्रित सुविधा, संस्थेत झालेले संशोधन, संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळालेली प्लेसमेंट, विविध संस्थांकडून मिळालेल्या मान्यता, विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत तयार करण्यात आलेली सुविधा, संस्थेत उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्त्या, संस्थेला मिळालेले मानांकन अशी विविध माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. ही माहिती संकेतस्थळावर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना होणारी फसवणूक टळणार आहे.