Unseasonal rains : दोन कोटी खर्चूनही आपत्ती व्यवस्थापन नावालाच; नेमके काय साधले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 10:08 IST2026-04-04T10:04:05+5:302026-04-04T10:08:34+5:30

- एवढे करून आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा उपयोग पूर्वीप्रमाणेच केवळ कॉल सेंटर म्हणूनच केला जात आहे.

Unseasonal rains Disaster management is only in name despite spending Rs. 2 crores | Unseasonal rains : दोन कोटी खर्चूनही आपत्ती व्यवस्थापन नावालाच; नेमके काय साधले ?

Unseasonal rains : दोन कोटी खर्चूनही आपत्ती व्यवस्थापन नावालाच; नेमके काय साधले ?

पुणे : पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती, रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी आणि अपघात यांची संपूर्ण माहिती मुंबई महापालिकेतील सुसज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळते. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेने दोन कोटी रुपये खर्च करून एक मोठा व सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला आहे. मात्र, त्यानंतरही या कक्षाचा उपयोग केवळ कॉल सेंटर पुरताच मर्यादित असून, या कक्षाच्या प्रमुखपदाची जबाबदारी यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे, त्याच अधिकाऱ्यावर दिल्याने कामकाजात कसलीही सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे कक्षासाठी खर्च केलेले दोन कोटी पाण्यात तर गेले नाहीत, ना अशी शंका उपस्थित होते.

महापालिका आयुक्त कार्यालयाच्या वर असलेल्या चौथ्या मजल्यावर महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष होता. याठिकाणी शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींद्वारे प्रमुख ठिकाणची लाइव्ह स्थिती पाहण्याची सुविधा होती. कंट्रोल रूम व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्याची जागा आहे. अवघ्या ६४० चौ. फूट अडगळीच्या जागेत अगदी दाटीवाटीत कर्मचाऱ्यांना बसावे लागते. शिवाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे स्वतःची अशी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे ज्या विभागाशी संबंधित तक्रार आली आहे, त्या विभागाला कळविले एवढेच काम कक्षातून केले जात होते. म्हणजे कक्षाचा वापर केवळ कॉल सेंटर म्हणून होत होता. 

आंबिल ओढा पूर व इतर आपत्तीच्या वेळी उडालेली प्रशासनाची दाणादाण लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या धर्तीवर महापालिका भवनमधील जुन्या इमारतीतील पश्चिमेकडील विंगमधील मुख्य लेखा परीक्षक विभाग, विशेष शाखेचे उपायुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, स्वच्छ सर्वेक्षण अभियान, बांधकाम विकास आणि विधी विभागाचे स्टोअर रूम इतरत्र हलवून या संपूर्ण मजल्यावर दोन कोटी रुपये खर्च करून आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात इंजिनिअरिंग रूम, कंट्रोल रूम, कॉन्फरन्स रूम, कन्सल्टेशन रूम, कॉम्प्युटर व सर्व्हर रूम, लायब्ररी, आठ बेडची सुविधा असलेली स्टाफ रेस्ट रूम केली आहे.

एवढे करून आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा उपयोग पूर्वीप्रमाणेच केवळ कॉल सेंटर म्हणूनच केला जात आहे. शिवाय आंबिल ओढ्याला आलेल्या पुराच्या वेळी कर्तव्यात कसून केला म्हणून कारवाईला सामोरे गेलेले महापालिका उपायुक्त गणेश सोनुने यांच्याकडे आताही आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असल्याने दोन कोटी खर्च करून महापालिकेने नेमके काय साध्य केले, असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title : पुणे का आपदा प्रबंधन: दो करोड़ खर्च, केवल कॉल सेंटर?

Web Summary : पुणे ने मुंबई की तरह आपदा प्रबंधन सेल पर दो करोड़ खर्च किए, पर यह केवल कॉल सेंटर है। पहले दंडित अधिकारी का नेतृत्व, निवेश के उद्देश्य और आपात स्थितियों से निपटने में प्रभावशीलता पर सवाल उठाता है।

Web Title : Pune's disaster management: Two crores spent, only a call center?

Web Summary : Pune spent two crores on a disaster management cell, mirroring Mumbai's. Yet, it's just a call center. An official previously penalized now leads it, raising questions about the investment's purpose and effectiveness in handling emergencies.