पुण्यात गाईचे पाय बांधून अनैसर्गिक अत्याचार; सोळा वर्षीय तरुणाचे संतापजनक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 09:45 IST2022-12-14T09:45:41+5:302022-12-14T09:45:49+5:30

फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या एका सोळा वर्षीय तरुणाला हडपसर पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले

Unnatural torture by tying cow legs in Pune An outrageous act by a sixteen year-old | पुण्यात गाईचे पाय बांधून अनैसर्गिक अत्याचार; सोळा वर्षीय तरुणाचे संतापजनक कृत्य

पुण्यात गाईचे पाय बांधून अनैसर्गिक अत्याचार; सोळा वर्षीय तरुणाचे संतापजनक कृत्य

पुणे/किरण शिंदे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक संतापजनक कृत्य उघडकीस आले आहे. एका सोळा वर्षीय मुलाने मोकळ्या जागेत बांधलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार केला. फुरसुंगी येथील कामठे आळी परिसरात 13 डिसेंबर च्या पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या एका सोळा वर्षीय तरुणाला हडपसर पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.  या प्रकरणी भादवी 377 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 28 वर्षीय तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी फुरसुंगी परिसरात राहतात. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची जर्सी जातीची गाय बांधली होती. दरम्यान रात्रीच्या सुमारास सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणाने या गाईचे पाय बांधून तिच्यासोबत अनैसर्गिक संभोग केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठत संबंधित तरुणाविरोधात तक्रार दिली आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करत संबंधित अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Unnatural torture by tying cow legs in Pune An outrageous act by a sixteen year-old