कात्रजजवळ विनापरवाना बैलगाडा शर्यतीचं आयोजन; १५ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:56 IST2025-08-04T12:56:01+5:302025-08-04T12:56:35+5:30

बैलगाडा शर्यत कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न करता आणि कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शर्यत भरवण्यात आली होती

Unlicensed bullock cart race organized near Katraj; Case registered against more than 15 people | कात्रजजवळ विनापरवाना बैलगाडा शर्यतीचं आयोजन; १५ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कात्रजजवळ विनापरवाना बैलगाडा शर्यतीचं आयोजन; १५ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे: कात्रज जवळील गुजर निंबाळकरवाडी येथे रविवारी (दि. ३ ऑगस्ट) पोलिस आणि स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीच्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात १५ हून अधिक आयोजक, सहभागी आणि बैलगाडा मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस अंमलदार सचिन पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आदित्य सणस, वृषभ भालचंद्र धावडे, हेमंत मुकुंद बेंद्रे, रोहित भारत रणमळे, आदित्य मोहन शिंदे, ओमकार इंगवले, दिगंबर होळवले, प्रथमेश गातळे, अनिकेत बगडे, सादिक शिंदे, सुरज मुंडे, विक्रम पवार आणि इतर आयोजकांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 123, 223, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110, 112 आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या शर्यतीचे आयोजन डोंगरालगत असलेल्या एका मोकळ्या जागेत करण्यात आले होते. मात्र, कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न करता आणि कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शर्यत भरवण्यात आली होती. शर्यतीदरम्यान घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी, ॲम्ब्युलन्स तसेच बॅरिकेटिंगसारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हती, ज्यामुळे प्रेक्षकांच्या तसेच सहभागींच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता.

पोलिसांनी शर्यत थांबवण्याच्या सूचना दिल्यानंतरही आयोजकांनी त्या दुर्लक्षित करत शर्यत सुरूच ठेवली. तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आरडाओरड करत पोलिसांच्या आदेशाचा अवमान केला. बैलांवर चाबकाचे फटके मारत क्रूरतेचे कृत्य करण्यात आले, असेही पोलिसांनी नोंदवले आहे.

Web Title: Unlicensed bullock cart race organized near Katraj; Case registered against more than 15 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.