म्हशीच्या गोठयात महिलेचा अज्ञातांनी केला खून; वडगाव मावळातील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:29 IST2022-03-14T15:29:05+5:302022-03-14T15:29:15+5:30

अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने तोंडावर, गळ्यावर, डोक्यावर, हातावर वार करून खून केला

Unknown murder of a woman in a buffalo herd Sensational incident in Wadgaon Mawla | म्हशीच्या गोठयात महिलेचा अज्ञातांनी केला खून; वडगाव मावळातील खळबळजनक घटना

म्हशीच्या गोठयात महिलेचा अज्ञातांनी केला खून; वडगाव मावळातील खळबळजनक घटना

वडगाव मावळ : शेतातील पेरणीचे काम करून म्हशीला पाणी देण्यासाठी गोठ्यामध्ये गेलेल्या महिलेवर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने डोक्यावर मानेवार वार करून खून केला. ही घटना आंदरमावळातील तळपेवाडी माळेगाव बुद्रुक येथे घडली. फासाबाई साळू निसाळ (वय ३६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 
या बाबत साळू मारूती निसाळ याने फिर्याद दिली आहे. 

वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे पती आणि पत्नी यांनी टाटा कंपनीच्या मालकीच्या क्षेत्रातून सामुहिक शेतीमंध्ये पेरणीचे काम करतात. आज  म्हशीला पाणी देण्यासाठी ते शेतातील गोठ्यामध्ये गेल्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने तोंडावर, गळ्यावर, डोक्यावर, हातावर वार करून खून केला.  पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय वडोदे करीत आहे. 

Web Title: Unknown murder of a woman in a buffalo herd Sensational incident in Wadgaon Mawla