पीसीएमटी कर्मचाऱ्यांवर अन्याय

By Admin | Updated: May 9, 2017 03:50 IST2017-05-09T03:50:15+5:302017-05-09T03:50:15+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेतून पीएमपीमध्ये रुजू झालेल्या १७८ कर्मचाऱ्यांनी पिंपरी महापालिकेत रुजू करुन घेण्याची मागणी केली

Unjustified on PCMT staff | पीसीएमटी कर्मचाऱ्यांवर अन्याय

पीसीएमटी कर्मचाऱ्यांवर अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतून पीएमपीमध्ये रुजू झालेल्या १७८ कर्मचाऱ्यांनी पिंपरी महापालिकेत रुजू करुन घेण्याची मागणी केली असून, त्यांना महापालिकेत समाविष्ट करा किंवा पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांची नियुक्ती करा, याबाबत महापौर नितीन काळजे आग्रही आहेत. या संदर्भात मंगळवारी महापालिकेत बैठक होणार आहे.
पीएमपीची सूत्रे हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी पीएमपीमधील कार्यप्रणालीत बदल केले आहेत. पीसीएमटीकडील अतिरिक्त कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पीसीएमटीकडून वर्ग केले. या कर्मचाऱ्यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाला नितांत गरज असल्याने पीएमपीकडे वर्ग करण्यात यावे, असे पत्र पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पिंपरी महापालिकेला दिले होते. तत्कालीन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांना पीएमपीत तत्काळ रुजू होण्याच आदेश दिले होते. त्यानंतर देखील रुजू होण्यास कर्मचारी टाळाटाळ करत होते. परंतु, मुंढे यांनी रुजू न झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर कर्मचारी एप्रिलला पीएमपीमध्ये रुजू झाले होते. अनेक कर्मचारी पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. त्यापैकी अनेक जण निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या कामगारांनी नेत्यांचे उंबरे झिजविणे सुरू केले आहे.

Web Title: Unjustified on PCMT staff