केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर; पण शरद पवारांचे निमंत्रण नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 01:59 PM2021-11-18T13:59:10+5:302021-11-18T13:59:29+5:30

शरद पवारांच्या या निमंत्रणावरून शाह पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला भेट देणार होते

Union Home Minister Amit Shah to visit Pune on November 26 But Sharad Pawar turned down the invitation | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर; पण शरद पवारांचे निमंत्रण नाकारले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर; पण शरद पवारांचे निमंत्रण नाकारले

Next

पुणे : भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) २६ नोव्हेंबरला शुक्रवारी पुण्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत गणेश क्रिडा कला मंच, स्वारगेट येथे पुणे शहर भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांना पुणे भेटीचे निमंत्रण दिले होते. पवारांच्या या निमंत्रणावरून शाह पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला (Vasantdada Sugar Institute) भेट देणार होते. परंतु अमित शाह यांच्या दौऱ्यामध्ये इन्स्टिट्यूटला भेट देण्याचा उल्लेख नसल्याचे एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे. 

''या मेळाव्याच्या तयारीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची विविध व्यवस्था आणि नियोजन बैठकही घेण्यात आली. १८ नोव्हेंबरपासून पुढील चार दिवस मंडलनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये स्थानिक आमदार, मंडल अध्यक्ष, शहर पदाधिकारी आणि नगरसेवक मार्गदर्शन करतील. त्यानंतर चार दिवसांत मंडलनिहाय पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख आणि बूथ समिती सदस्यांच्या बैठका होणार आहेत,' अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे.''  

अमित शाह यांच्याकडे सहकार खाते या नात्याने दिले होते निमंत्रण 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांना पुणे भेटीचे निमंत्रण दिले होते. शाह यांच्याकडे सहकार खाते आल्याने सहकार खात्याशी संबंधित मुद्यांबाबत ही भेट होती. त्यात महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवरही चर्चा होणार असल्याचे समजले होते. शाह यांनी सुद्धा या भेटीला होकार दर्शवला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कही लढवले जात होते. पण अमित शाह यांनी निमंत्रण नाकारल्याचे समोर येत आहे. 

Web Title: Union Home Minister Amit Shah to visit Pune on November 26 But Sharad Pawar turned down the invitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.