पुण्यातील विश्रांतवाडीत अज्ञात वाहनाने चिरडल्याने दुचाकीस्वार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 14:03 IST2020-02-24T14:02:19+5:302020-02-24T14:03:52+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचारीस्वाराचा मृत्यू झाला आहे. फरार वाहनचालकाचा पाेलीस शाेधे घेत आहेत.

पुण्यातील विश्रांतवाडीत अज्ञात वाहनाने चिरडल्याने दुचाकीस्वार ठार
पुणे : अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तरूणाच्या डोक्यावरुन चाक गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी चौकात हा भीषण अपघात झाला.
गणेश पंढरी कसबे (वय 38,रा.लक्ष्मीनगर येरवडा) याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी चौकात हा अपघात झाला. दुचाकी क्र.(एम.एच.14 एफ.के.7166) हि कळस म्हस्केवस्ती चौकाकडून आळंदी रस्त्याने विश्रांतवाडीच्या दिशेने येत होती. अचानक एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वाहनाच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघात करणारा वाहनचालक फरार झाला. या भीषण अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ मृतदेह ससून रुग्णालयात रवाना केला. नेमका अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही.रात्री उशिरा दुचाकी चालकाची ओळख पटली.गणेश कसबे यांचा दिघी येथे भंगारचा व्यवसाय आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दिघी येथून नेहमीप्रमाणे घरी परत येत असताना, हा भीषण अपघात झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अपघात करणार्या फरार वाहनाचालकाचा शोध सुरू आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.