शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वैफल्यग्रस्त जगतापांचे बिनबुडाचे आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:13 IST

पुणे : “ॲॅमेनिटी स्पेसच्या विषयावरून ‘राष्ट्रवादी’त माजलेले रणकंदन, स्थायी समिती सदस्यांसह पक्षादेश धुडकावणारे नगरसेवक आणि महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच ...

पुणे : “ॲॅमेनिटी स्पेसच्या विषयावरून ‘राष्ट्रवादी’त माजलेले रणकंदन, स्थायी समिती सदस्यांसह पक्षादेश धुडकावणारे नगरसेवक आणि महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच दिसू लागलेला पराभव, यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप वैफल्यग्रस्त झाले आहेत. आपले अपयश लपविण्यासाठी बेछुट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत,” अशी टीका भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने पुण्यात कामांचा धडाका लावला असून २०१७ च्या निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत आणली आहेत. येत्या मनपा निवडणुकीत पुणेकर पुन्हा एकदा भाजपला पसंती देतील हे लक्षात आल्याने जगताप आपले अस्तित्व टिकविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करत असल्याचे खर्डेकर म्हणाले.

मात्र या प्रयत्नात आपलेच हसू होत आहे हे त्यांच्या लक्षात येत नसावे. राजकीय सभ्यतेनुसार त्यांनी त्यांच्या बरोबरीच्या नेत्यांवर टीका केली तर समजून घेता येईल; पण थेट भाजप प्रदेशाध्यक्षांवर आरोप करताना त्यांना सभ्यतेचे भान राहिलेले नाही. जगतापांचा सारा खटाटोप प्रसिद्धीसाठी असून मोठ्या नेत्यांवर बोलले की वारेमाप प्रसिद्धी मिळते आणि आपले अपयशही झाकता येते असा त्यांचा गैरसमज आहे, असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.