दुर्दैवी! खोकल्याचे समजून तणनाशक औषध केले प्राशन; पोलीस कर्मचाऱ्याने गमावले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 16:53 IST2021-03-30T16:38:12+5:302021-03-30T16:53:38+5:30
दोन-तीन दिवस खोकला येत असल्याने त्यांनी रात्री खोकल्याचे औषध समजून तणनाशक टू फोर डी हे विषारी औषध प्राशन केले.

दुर्दैवी! खोकल्याचे समजून तणनाशक औषध केले प्राशन; पोलीस कर्मचाऱ्याने गमावले प्राण
बारामती: खोकल्याचे औषध समजून तणनाशक पिल्याने बारामती तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोपट दराडे असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
बारामती ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोपट दराडे (वय ४५) अकोले (ता. इंदापूर) येथे वास्तव्यास होते. दराडे आपले ड्युटी बजावून घरी आराम करत होते. त्यांना दोन-तीन दिवस खोकला येत होता. रात्री त्यांनी खोकल्याचे औषध समजून तणनाशक टू फोर डी हे विषारी औषध प्राशन केले.
दराडे यांना थोड्या वेळानंतर त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांनी घरच्यांना, मी हे औषध प्यायलो आहे,असे सांगितले. त्यानंतर कुटुंबातील लोकांनी त्यांना लगोलग उपचारासाठी रुग्णालयात दाखलं केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
————————