दुर्दैवी! शिरूर तालुक्यात दोन सख्या भावांचा कोरोनाने मृत्यू, एकाच दिवसात गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 04:26 PM2021-05-14T16:26:58+5:302021-05-14T16:27:40+5:30

बाभूळसर बुद्रुक परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त

Unfortunately! Corona kills two brothers in Shirur taluka, just two hours apart | दुर्दैवी! शिरूर तालुक्यात दोन सख्या भावांचा कोरोनाने मृत्यू, एकाच दिवसात गमावला जीव

दुर्दैवी! शिरूर तालुक्यात दोन सख्या भावांचा कोरोनाने मृत्यू, एकाच दिवसात गमावला जीव

Next
ठळक मुद्देदोघेही भाऊ वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी होते दाखल

रांजणगाव सांडस : शिरूर तालुक्यातील बाभूळसर बुद्रुक येथे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गावातील एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बाभूळसर बुद्रुक येथील विठ्ठल भगवान नागवडे (वय ५६ ) व त्यांचे लहान भाऊ सुभाष भगवान नागवडे ( वय ५३ ) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. दोन्ही भावांना वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नागवडे कुटुंबातील विठ्ठल यांचा उपचार सुरू असतानाच केडगाव येथे खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. यानंतर अवघ्या काही तासांतच विठ्ठल यांचे लहान भाऊ सुभाष नागवडे यांचाही मांडवगण फराटा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला.

विठ्ठल व सुभाष यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुले, मुली, सूना असा परिवार आहे. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील बाभूळसर बुद्रुक येथे अवघ्या दोन तासांच्या अंतरावर दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील मांडवगण फराटा, वडगाव रसाई, तांदळी , इनामगाव शिरसगाव काटा, पिंपळसुटी या गावांनी, वाड्या वस्त्यावर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊन अनेक  नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Unfortunately! Corona kills two brothers in Shirur taluka, just two hours apart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app