Unfortunately! Child girl died on his birthday after falling from a gallery while playing; Incident at Narhe | दुर्दैवी! खेळताना गॅलरीमधून पडल्याने चिमुकलीचा बर्थ डे दिवशीच मृत्यू ; नऱ्हे येथील घटना

दुर्दैवी! खेळताना गॅलरीमधून पडल्याने चिमुकलीचा बर्थ डे दिवशीच मृत्यू ; नऱ्हे येथील घटना

धायरी: खेळताना घरातील गॅलरीमधून खाली पडल्याने चिमुकलीचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अद्विका धरतेज दाथाडे (वय: १ वर्ष, रा. राजवीर हाईट्स, अभिनव कॉलेज परिसर, नऱ्हे, पुणे) असे मयत चिमुरडीचे नाव आहे. सदर घटना मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. 

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे बीड जिल्ह्यातील असणारे गाथाडे कुटुंबीय नऱ्हे परिसरात वास्तव्यास आहेत. धरतेज दाथाडे हे खासगी कंपनीत कामास असून ते अभिनव कॉलेज परिसरातील राजवीर हाईट्समध्ये पाचव्या मजल्यावर राहावयास आहेत. 
बुधवारी धरतेज यांची कन्या अद्विकाचा पहिला वाढदिवस असल्याने सायंकाळी घरी धावपळ सुरू होती. वाढदिवसाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. इमारतीतील लोकांना वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी अद्वीकाची आई दुसऱ्या मजल्यावर गेली. दरम्यान तिचे वडील बाथरूममध्ये गेले असता अद्विका खेळता - खेळता गॅलरीकडे गेली, व तिचा तोल जाऊन खाली पडली.  शेजाऱ्यांना दाथाडे यांच्या गॅलरीतून अद्वीका खाली पडल्याचे दिसले. पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास तिचा उपचारादम्यान मृत्यू झाला. सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद महांगडे करीत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Unfortunately! Child girl died on his birthday after falling from a gallery while playing; Incident at Narhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.