दुर्दैवी घटना! शाळेला गेलेल्या ९ वर्षीय रोहनचा सर्पदंशामुळे मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 16:05 IST2024-04-20T16:05:18+5:302024-04-20T16:05:55+5:30
डांगले परिवारावर मोठा आघात झाला असून याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे...

दुर्दैवी घटना! शाळेला गेलेल्या ९ वर्षीय रोहनचा सर्पदंशामुळे मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
पाईट (पुणे) : सर्पदंशाने शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पाईट, ता. खेड येथे घडली. येथील लोदुंगवाडी मधील रोहन शरद डांगले (वय ९ वर्ष ) हा शाळकरी मुलगा सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेला असता त्यास शाळेच्या परिसरात सर्प दंश झाल्याची घटना घडली.
रोहनला प्राथमिक उपचार करण्यासाठी पाईट प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले. नंतर चांडोली ग्रामीण आरोग्य रुग्णालयात दिले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. पाईट येथील ग्रामदेवतेची यात्रा सुरू असताना या घटनेने डांगले परिवारावर मोठा आघात झाला असून याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.