शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस वाहने पालिका करणार जप्त

By admin | Updated: October 25, 2015 03:42 IST

शहरातील गल्लीबोळ आणि प्रमुख रस्त्यावर वर्षानुवर्षे पडून असलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने जप्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. येत्या सोमवारपासून

पुणे : शहरातील गल्लीबोळ आणि प्रमुख रस्त्यावर वर्षानुवर्षे पडून असलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने जप्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. येत्या सोमवारपासून ही मोहीम हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात या वाहनांच्या मालकांना सात दिवसात संबधित वाहन हालविण्याची नोटिस बजाविण्यात येणार आहे. त्यानंतरही वाहन रस्त्यावरून न हटविल्यास ते जप्त करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी दिली. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच या वाहनांमुळे रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे ही वाहने काढण्याची मागणी वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. शहरात १५ वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या तब्बल एक लाखाहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. नियमानुसार, संबधित वाहन मालकांनी ही वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. हजारो वाहन मालक ही वाहने स्क्रॅप करत नाही. ती स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने हे मालक ही वाहने घराबाहेर अथवा रस्त्यावरच लावतात. ही वाहने गेली अनेक वर्षे रस्त्याच्या कडेला पडून असल्याने ती वाहतुकीसाठी अडथळे ठरत आहेत. त्यातच या वाहनांमुळे दहशतवादी कारवायांसाठी वापर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वाहतूक पोलिसांनीही महापालिकेस पत्र पाठवून या वाहनांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यानुसार, येत्या सोमवारपासून ही कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.गाड्या जप्त करणार येत्या सोमवारपासून रस्त्यावरील या गाड्यांचे सर्वेक्षण महापालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार, ज्या बेवारस गाड्या असतील त्या जप्त केल्या जातील तर त्याच परिसरात मालक राहत असल्यास त्यांना सात दिवसांच्या आत ही वाहने रस्त्यावरून हलविण्याची ताकीद देण्यात येईल. त्यानंतरही वाहने न उचल्यास ती महापालिकेकडून जप्त करण्यात येणार आहेत. त्यानंतर मालक संबधित वाहन घेण्यासाठी आल्यास त्यांच्याकडून कारवाईचा खर्च तसेच दंड वसूल केला जाणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.