उजनी, भीमा नदीपात्रातून बेसुमार वाळूउपसा सुरूच

By Admin | Updated: January 23, 2017 02:40 IST2017-01-23T02:40:29+5:302017-01-23T02:40:29+5:30

इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो शेतकरी व गावालगत असणाऱ्या नागरिकांना वरदान असलेल्या नीरा नदीला वाळूमाफियांची

Ujani, Bhima river basin starts uninterrupted sandstorm | उजनी, भीमा नदीपात्रातून बेसुमार वाळूउपसा सुरूच

उजनी, भीमा नदीपात्रातून बेसुमार वाळूउपसा सुरूच

निरवांगी : इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो शेतकरी व गावालगत असणाऱ्या नागरिकांना वरदान असलेल्या नीरा नदीला वाळूमाफियांची दुष्ट नजर लागली आहे.य् ाा नदीच्या पात्रातून कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करिता लाखो रुपयांची वाळू दिवसरात्र चोरली जात आहे. निरवांगी चौकात वाळूने भरलेले टिपर व अन्य वाहने वाहतूक करताना दिसत आहेत. उजनी, भीमा नदीपात्रातील वाळूउपसा रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी होत आहे.
भोर व वीर धरण क्षेत्रातून नीरा नदीला पाणी सोडले जाते. या पाण्यावर इंदापूर, फलटण, बारामतीचे हजारो शेतकऱ्यांचे क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. त्याचप्रमाणे या नदीचे पात्र सोनगाव, उद्धट, तावशी, कुरवली, कंळब, भोरकरवाडी, निमसाखर, रासकरमळा , निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, सराटी, नीरा नरसिंहपूर आदी गावांलगत गेलेले असल्याने हजारो नागरिकांचा, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे. परंतु या नदीपात्रातील वाळूचा लिलाव झालेला नसल्याने या वाळूवर वाळूमाफियांची नजर लागली. नदीच्या पात्रातून कोणतीही ग्ांुतवणूक न करता लाखो रुपयांची वाळू चोरली गेली आहे. वाळूउपशामुळे या नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे तयार झाले असल्याचे दिसून येत आहे. ही उपसा केलेली वाळू बारामती शहराकडे बीकेबीएन या रस्त्याने दिवस रात्र वाहतूक केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Ujani, Bhima river basin starts uninterrupted sandstorm