उर्दूमध्ये पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरेंचे विचार परिवर्तन; हिंदुत्वापासून ते कोसो दूर-पडळकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 04:27 PM2023-03-26T16:27:21+5:302023-03-26T16:28:07+5:30

बाळासाहेब ठाकरे ज्या ताकदीने या देशात हिंदुत्वाचे काम करत होते त्याच्याबरोबर विरूद्ध दिशेला उद्धव ठाकरे यांची विचारसरणी गेली

Uddhav Thackeray's change of mind until posters in Urdu; Criticism of far-flung people from Hinduism to Koso | उर्दूमध्ये पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरेंचे विचार परिवर्तन; हिंदुत्वापासून ते कोसो दूर-पडळकरांची टीका

उर्दूमध्ये पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरेंचे विचार परिवर्तन; हिंदुत्वापासून ते कोसो दूर-पडळकरांची टीका

googlenewsNext

बारामती: जनाब बाळासाहेब ठाकरे लिहण्यापासून ते उर्दूमध्ये त्यांचे पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांचे विचार परिवर्तन झाले आहे. हिंदुत्वापासून ते कोसो दूर गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे ज्या ताकदीने या देशात हिंदुत्वाचे काम करत होते. त्याच्याबरोबर विरूद्ध दिशेला उद्धव ठाकरे यांची विचारसरणी गेली आहे. आता त्यांच्याकडे पर्याय नाही. हिंदुत्व त्यांच्याकडे राहिले नाही. त्यामुळे अशा लोकांना बरोबर घेतल्याशिवाय त्यांना त्यांचे राजकारण करता येणार नसल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 

बारामती-इंदापूर तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या ५२ शाखांचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आमदार गोपिचंद पडळकर यांच्या हस्ते रविवारी (दि. २६) झाले यावेळी पडळकर माध्यमांशी बोलत होते. 

पडळकर म्हणाले, बारामतीमध्ये पवारांच्या नेतृत्वाबद्दल प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.  त्यांच्या विरोधात जाण्याची मानसिकता तरूण पिढीमध्ये झाली आहे. या भागातील तरूणांचे संघटन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या ५२ शाखा बारामती-इंदापूरमध्ये सुरू करण्यता आल्या आहेत. ‘मिशन बारामती लोकसभा’ यासाठी या शाखा सुरू करण्यात आल्या नाहीत. तर भाजपचे हे रूटीन वर्क आहे. वर्षातले ३६५ दिवस भाजप या पद्धतीने काम करते. गावगाड्यातील विविध प्रश्न या शाखांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी व तरूणांची फळी उभी करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. मागील अनेक वर्ष राज्यातील प्रमुख नेतृत्व येथील नेत्यांकडे होते. मात्र येथील अनेक प्रश्न आजही प्रलंबीत आहेत. पळशी येथे आम्ही शाखा उद्घाटनासाठी गेलो होते. त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी पुरंदर उपसाच्या पाण्याबाबत तक्रारी केल्या. ते पाणी वेळेवर मिळत नाही. त्याची दर आकारणी अधिक असल्याने हा दर कमी कारावा अशी त्यांची मागणी होती. 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुरंदर येथील सभेला आले होते. तेंव्हा त्यांची या उपसा योजनेचे दर कमी केले. जानाई-शिरसाई पट्ट्यातील गावांमध्ये सुद्धा दुष्काळ आहे. एकिकडे देशातील मान्यवर नेत्यांचा तुम्ही बारामतीला आणायचे, स्वत:चे कौैतुक करून घ्यायचे, पाठ थोपटून घ्यायची, असा टोला पडळकर यांनी पवार कुटूंबाला लावला. या भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर येथील गाऱ्हाणी घालण्यासाठी आज आम्ही येथे आलो आहोत, असे पडळकर यावेळी म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray's change of mind until posters in Urdu; Criticism of far-flung people from Hinduism to Koso

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.