उदयनराजे पुण्यात पवारांच्या भेटीला; पक्षांतर थांबविण्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 11:54 IST2019-09-12T10:49:15+5:302019-09-12T11:54:45+5:30
उदयनराजे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश रखडला आहे. दोन दिवसांपूर्वीच ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटले होते.

उदयनराजे पुण्यात पवारांच्या भेटीला; पक्षांतर थांबविण्याची चर्चा
पुणे : भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेले राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे आज सकाळी 10 वाजता पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले आहेत. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ही उपस्थित असून तिघांमध्ये चर्चा सुरू आहे.
उदयनराजे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश रखडला आहे. दोन दिवसांपूर्वीच ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटले होते. तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही गुप्त बैठक घेत त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे उदयनराजे राष्ट्रवादीत राहणार की भाजपात जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान, उदयनराजे हे आज पवार यांच्या शिवाजीनगरमधील निवासस्थानी गेले आहेत. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखिल उपस्थित असून बैठकीत काय चर्चा होते याकडे लक्ष लागले आहे. उदयनराजे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे त्याचबरोबर राजू शेट्टी यांनीही प्रयत्नही केला होता. आता ते थेट पवार यांच्या भेटीला गेल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लागणार का याबाबत उत्सुकता आहे.