शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Pune: उबेर चालकाच्या खून; मृतदेह घाटात फेकून दिला, आरोपीला अखेर पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:14 IST

गणेशखिंड घाटात गाडी थांबवल्यानंतर आरोपी व चालक यांच्यात वाद होऊन झटापट झाली, यावेळी आरोपीने चालकाच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्या मानेवर वार करून त्याचा खून केला

ओतूर: उबेर चालकाचा खून करून मृतदेह घाटात फेकून दिल्याच्या प्रकरणात ओतूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक केली आहे. आदर्श चंद्रकांत भालेराव (वय २१, रा. संकेश्वर किस्टल सोसायटी, गणेश विद्यालयाजवळ, टिटवाळा ईस्ट, ता. कल्याण, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.   नासीर अहमद सलामतुल्ला अन्सारी (वय २६, मूळ रा. शेरकोट, ता. धामपूर, जि. बिजनोर, उत्तर प्रदेश; सध्या रा. समता नगर, सेक्टर १, ऐरोली नाका, नवी मुंबई) हा उबेर चालक ५ मार्च रोजी टिटवाळा येथून जुन्नरकडे प्रवासी घेऊन निघाला होता. माळशेज घाटमार्गे सितेवाडी (ता. जुन्नर) येथील गणेशखिंड घाटात गाडी थांबवल्यानंतर आरोपी व चालक यांच्यात वाद होऊन झटापट झाली. यावेळी आरोपीने चालकाच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्या मानेवर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह घाटातील सिमेंटच्या कठड्यावरून खाली फेकून आरोपी गाडी घेऊन टिटवाळ्याकडे पळून गेला. मृताच्या भावाने मोहम्मद अमिर सलामतुल्ला अन्सारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ मार्च रोजी भा. न्याय संहिता २०२३ कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उबेर कंपनीकडील माहिती व जीपीएस तपासातून आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.    पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ओतूर एल.जी. थाटे, पीएसआय संदिप आमणे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे,नामदेव बांबळे,बाळशिराम भवारी, देविदाव खेडकर,भरत सुर्यवंशी, रोहित बोंबले यांनी ही कारवाई केली. आरोपीला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Uber Driver Murdered, Body Dumped, Accused Arrested

Web Summary : Uber driver murdered near Pune; body found in ghat. Police arrested the accused, identified as Adarsh Bhalerao, after a swift investigation using Uber data and GPS tracking.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसUberउबरDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीArrestअटक