शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

संविधानाने दिलेल्या अधिकारांबराेबरच जबाबदारीचे भान असु द्या : राज्यवर्धन राठाेड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 7:50 PM

सिंबायाेसिस इंटरनँशनल युनिर्व्हसिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’’ या कार्यक्रमात राज्यवर्धन राठाेड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पुणे : संविधानाच्या नावाने आता जी ओरड होत आहे त्यातील अधिकारांचा आपण अभ्यास करत नाही. केवळ त्या अधिकारांवर गदा आली असे म्हणतो. मात्र त्या अधिकारांबरोबर येणा-या जबाबदारीचे भान आपण ठेवत नाही. येणा-या काळात विविध नवनवीन विकासाची दालने आपल्या सर्वांकरिता खुली होतील. त्याचा वेळीच लाभ घेण्याची गरज असून उज्ज्वल भवितव्याकरिता योग्य  ‘‘नेतृत्व’’ निवडीची गरज आहे. असे मत माहिती व प्रसारण  मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी व्यक्त केले. 

सिंबायाेसिस इंटरनँशनल युनिर्व्हसिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सिंबायाेसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ.शां.ब.मुजूमदार, उपकुलपती डॉ.विद्या येरवडेकर, डॉ.रजनी गुप्ते आणि डॉ.आर.राजन उपस्थित होते. 

देशउभारणीत तरुणांची भूमिका यावर बोलताना राठोड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आगामी काळातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय धडे दिले. ते म्हणाले, देशासमोर सध्या नवनवीन आव्हाने आहेत. मात्र त्यांना सामोरे जाण्याकरिता तरुणाई समर्थ आहे. चौकटीबाहेर जावून विचार करण्याची क्षमता आणि आपल्या पध्दतीने वेगळ्या सिध्दांताची मांडणी करत त्यांची वाटचाल सुरु आहे. काही वेगळे करु पाहणारा असा हा तरुणवर्ग आहे. देशातील 25 टक्क्यांहून अधिक तरुणाई सोशल मीडियावर कार्यरत आहे. आपल्या विकासाकरिता नेतृत्वाची निवड महत्वाची ठरते. या नेतृत्वाची निवड योग्य पध्दतीने व्हायला हवी. जगभरातील मोठी बाजारपेठ म्हणून पाहिल्या जाणा-या भारत देशात यापुढील काळात प्रचंड रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून त्याकरिता आपली कवाडे उघडण्याची गरज आहे. देश केंद्रीभूत मानून विकासाचा विचार व्हायला हवा. संविधानात नमूद केलेले अधिकार आणि स्वातंत्र्य यांची योग्य पध्दतीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. ते तत्व पाळले गेल्यास मूल्यवान नागरिक तयार होतील. यावेळी राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. याप्रसंगी डॉ.शां.ब.मुजूमदार यांनी देखील मनोगत व्यक्त केले. 

अभ्यासात जेमतेम आणि बँकबेंचर्स होतो...  अकरावीपर्यंत शिक्षण घेतलेला माणूस मंत्रीपदापर्यंत पोहचु शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे सातत्याने लढण्याची असलेली इच्छा. पुण्यातील एनडीएमध्येच शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात फार हुशार नव्हतो. बँकबेंचर्स होतो. वर्गात गणिताच्या शिक्षकांचा तास सुरु असताना मागील बाकावर बसून हॉलीबॉलच्या सामन्याची रणनीती ठरवण्याचे काम सुरु असायचे. मात्र आतापर्यंतच्या प्रवासात  ‘‘सेल्फ रिस्पेक्ट’’ हा कायम जपला. त्यामुळेच आलेल्या संकटांना समर्थपणे तोंड देण्याचे धैर्य आपल्यात आल्याची आठवण राठोड यांनी यावेळी सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. 

टॅग्स :symbiosisसिंबायोसिसPuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकार