'टायसन'ला लाकडी दांडक्याने मारहाण, मुन्ना शेख विरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 11:09 IST2022-12-13T11:09:10+5:302022-12-13T11:09:19+5:30

वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 7 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला

'Tyson' beaten up with a wooden stick, case filed against Munna Sheikh | 'टायसन'ला लाकडी दांडक्याने मारहाण, मुन्ना शेख विरोधात गुन्हा दाखल

'टायसन'ला लाकडी दांडक्याने मारहाण, मुन्ना शेख विरोधात गुन्हा दाखल

पुणे/किरण शिंदे : एका डोळ्याची दृष्टी कमी असणाऱ्या टायसन नामक कुत्र्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करणाऱ्या एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 7 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी एका 56 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार मुन्ना शेख नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी फातिमानगर येथील टेन स्क्वेअर सोसायटीत राहतात. फिर्यादी राहत असलेल्या परिसरामध्ये काही भटकी कुत्री आहेत. त्यातील एक तांबड्या रंगाचा आणि दृष्टी कमी असलेल्या टायसन नावाच्या कुत्र्याला मुन्ना शेख यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणी त टायसन याच्या अंगावर आणि तोंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत. फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: 'Tyson' beaten up with a wooden stick, case filed against Munna Sheikh