शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

नवनियुक्त पोलीस आयुक्तांचे 'कोरोना वॉरियर्स'ला आपुलकी अन् धीराचे दोन शब्द..! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 12:03 PM

हॉस्पिटल, होम क्वारंटाईन असलेल्या पोलिसांना दिला आत्मविश्वास

पुणे : नूतन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असतानाच कोरोना संसर्गामुळे हॉस्पिटल व होम क्वारंटाईन होऊन उपचार घेत असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.झुम मिटिंगद्वारे संवाद साधताना त्यांनी कर्मचाऱ्यांशी आस्थेवाईकपणे विचारपूस केली.पोलीस दल हे माझे कुटुंब असून नागरिकांच्या रक्षणाबरोबरच त्यांची काळजी घेण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचा आत्मविश्वास दिला. यावेळी पोलीस उपायुक्त मितेश घट्टे उपस्थित होते. घट्टे यांनी लॉकडाऊनपासून शहर पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती गुप्ता यांना दिली. शहर पोलीस दलातील १ हजार ८० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या १५० पोलीस सक्रीय रुग्ण असून आयुक्तांनी त्यापैकी १३० जणांशी संवाद साधला.त्यावेळी कोणाच्या कुटुंबामध्ये सर्व जण बाधित तर कोणी रुग्णालयातून डिस्चार्ज होऊन नुकतेच घरी परतलेले अशा सर्वांशी बोलताना कोरोना कधी झाला, उपचार व्यवस्थित चालू आहेत का?, लवकर बरे व्हा, अशी आपुलकीने विचारपूसही केली. गुप्ता यांनी केलेल्या आस्थेवाईक चौकशीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना गहिवरुन आले.बरे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाची छटा पाहून, कोरोना बाधित कुटुंबातील आईला जास्त त्रास देऊ नका, अशी मिस्किल टिपणीही आयुक्तांनी केली. 

़़़कुटुंबाच्या स्वास्थाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा दिला सल्लापोलीस कोविड योद्धांशी संवाद साधताना पोलीस आयुक्त गुप्ता यांनी आपल्या डॉक्टर बहिणीचे उदाहरण दिले. आपली डॉक्टर बहीण कोरोनाग्रस्तांच्या सेवेमध्ये व्यस्त असताना ती स्वत: देखील कोरोनाबाधित झाली आहे. त्यामुळे तिची दोन्ही मुलेही कोरोनाबाधित झाल्याची आठवण त्यांनी आवर्जुन सांगत कुटुंबाच्या स्वास्थाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा सल्ला देत असताना घरच्यांची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या असा प्रेमळ सल्लाही दिला.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याFamilyपरिवार