शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना उचलले; नाशिकमध्ये नजरकैदेत ठेवले
3
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
5
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
6
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
7
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
8
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
10
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
11
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
12
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
13
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
15
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
16
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
17
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
19
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
20
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

मोटारसायकल चोरट्यांकडून ८ लाख रुपयांच्या दुचाकी ताब्यात; चाकण पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:29 PM

चाकण शहरात पार्किंग केलेल्या मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ

चाकण : चाकण परिसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांविषयी नागरिकांचा अविश्वास बळावत चालला होता. यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या आदेशानुसार चाकण पोलीसांनी दणकेबाज कारवाई करत दोन मोटार सायकल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.

योगेश तुकाराम देवकर (वय.३० वर्षे ) दत्तात्रय गंगाराम गाडेबैल (वय.२६ वर्षे, दोन्ही रा. कवठे यमाई ता. शिरूर जि. पुणे ) यांना चाकण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमंतीच्या एकुण १५ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण शहरात पार्किंग केलेल्या मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड आणि विक्रम गायकवाड यांच्या पथकाने वाहन चोरीच्या घटनास्थळाच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच सदर मोबाईलचा तांत्रिक विश्लेषन तपास करून घटनास्थळी दिसलेल्या इसमांबाबत माहिती प्राप्त करून, चाकण पोलीस पथकाने मोटार सायकल चोरी करणारे योगेश देवकर व दत्तात्रय गाडेबैल या दोघांना कवठे यमाई येथे सापळा रचुन ताब्यात घेतले. चोरट्यांनी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या एकुण १५ मोटार सायकली ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक युनुस मुलाणी,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड,विक्रम गायकवाड,संदिप सोनवणे,राजु जाधव,हनुमंत कांबळे,निखील शेटे,नितीन गुंजाळ,सुनिल भागवत,संदिप गंगावणे, अशोक दिवटे,महेश कोळी,विवेक सानप,प्रतिक चव्हाण,अरुण शिंदे,महादेव बिक्कड,माधुरी कचाटे यांनी वरील कारवाई केलेली आहे.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीbikeबाईकThiefचोर