पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 17:19 IST2023-03-10T17:18:32+5:302023-03-10T17:19:42+5:30
हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत झाला...

पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, दोन जखमी
मंचर (पुणे) : दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. हा अपघातपुणे-नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री सात वाजता झाला. गुलाब खंडू भालेराव (वय ६०, रा. कळंब) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सातच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत सहानेमळा येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. आकाश ज्ञानेश्वर ढोरे हा मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच १४-जीडब्ल्यू ६४८५) जात होता, तर गुलाब खंडू भालेराव हे स्कूटीवर (क्रमांक एमएच १४-ईए ८५६३) होते. दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले.
या अपघातात गुलाब खंडू भालेराव हे ठार झाले, तर आकाश ज्ञानेश्वर ढोरे व चैतन्य हे गंभीर जखमी झाले आहेत. यासंदर्भात निखिल ज्ञानेश्वर ढोरे यांनी फिर्याद दिल्यानंतर अपघातास कारणीभूत ठरल्याने गुलाब खंडू भालेराव यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस हवालदार नंदकुमार आढारी करीत आहेत.