Accident: दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले अन् परिणाम मुलीलाही भोगावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 15:25 IST2021-12-13T15:25:33+5:302021-12-13T15:25:42+5:30

दुचाकीवर मागे बसलेल्या मुलीच्या डोक्याला, पोटाला, हातापायाला मार लागून गंभीर जखमी झाली

the two wheeler lost control and the girl also had to suffer the consequences | Accident: दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले अन् परिणाम मुलीलाही भोगावे लागले

Accident: दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले अन् परिणाम मुलीलाही भोगावे लागले

पिंपरी : मादक पदार्थाच्या नशेत असलेल्या चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून अपघात झाला. यात दुचाकीस्वार आणि दुचाकीवरील त्याची मैत्रीण, असे दोघेही जखमी झाले. वाकड येथे हिंजवडी-वाकड रस्त्यावर गुरुवारी (दि. ९) हा अपघात झाला.

अजिंक्य रामदास संकपाळ (वय ४२, रा. शेखवस्ती, वाकड), असे दुचाकीस्वाराने नाव आहे. याप्रकरणी जखमी महिलेचे वडील रमेश धनपाल भोकरे (वय ५९, रा. गारगोटी, ता. भुदरगड, कोल्हापूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य त्याच्या दुचाकीवरून मुलीला घेऊन जात होता. भोकरे यांची मुलगी आणि अजिंक्य हे मित्र आहेत. अजिंक्य मादक पदार्थाच्या नशेत असताना त्याने दुचाकी भरधाव चालवली. त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. यात मुलीच्या डोक्याला, पोटाला, हातापायाला मार लागून गंभीर जखमी झाली. तसेच आरोपी अजिंक्य देखील जखमी झाला.

Web Title: the two wheeler lost control and the girl also had to suffer the consequences