Accident: ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार होमगार्डचा मृत्यू; अपघातानंतर ट्रकचालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 15:09 IST2021-12-13T15:08:54+5:302021-12-13T15:09:10+5:30
अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

Accident: ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार होमगार्डचा मृत्यू; अपघातानंतर ट्रकचालक फरार
पिंपरी : भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार होमगार्डचा मृत्यू झाला. पवळे ब्रिजवर, निगडी येथे रविवारी (दि. १२) सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला.
तेजस ओमप्रकाश लेले (वय ३२, रा. माळीनगर, वडगाव मावळ), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार होमगार्डचे नाव आहे. याप्रकरणी देवेंद्र अरुण कुरुमभट्टी (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुमभट्टी यांचा आत्येभाऊ तेजस लेले हे होमगार्ड होते. ते निगडी येथील पवळे उड्डाणपुलावरून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी एका भरधाव ट्रकने तेजस यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तेजस यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला.