ट्रॅक्टर उलटून शाळकरी दोन मुले ठार, एक गंभीर जखमी; पुणे जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 20:01 IST2023-04-21T20:00:30+5:302023-04-21T20:01:51+5:30
हा अपघात गुरुवारी रात्री घडला असून अन्य एक जण जखमी झाला आहे...

ट्रॅक्टर उलटून शाळकरी दोन मुले ठार, एक गंभीर जखमी; पुणे जिल्ह्यातील घटना
मंचर (पुणे) : शिरोली सुलतानपूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत ट्रॅक्टर उलटून शाळकरी मुले ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात गुरुवारी रात्री घडला असून अन्य एक जण जखमी झाला आहे.
कुणाल मच्छिंद्र भोर (वय १६), ओम दत्तात्रय भोर (१६), व पार्थ सुदर्शन भोर (१७, सर्व रा. रांजणी, ता. आंबेगाव) हे तिघेजण ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी घेऊन चालले होते. त्यावेळी कुणाल मच्छिंद्र भोर हा ट्रॅक्टर चालवत असताना अचानक ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पलटूनन अपघात झाला.
या अपघातात ट्रॅक्टर खाली येऊन कुणाल मच्छिंद्र भोर व ओम दत्तात्रय भोर हे दोघेजण जागीच ठार झाले तर पार्थ सुदर्शन भोर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अशोक भोर यांनी मंचर पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. पुढील तपास मंचर पोलिस करत आहे.