किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 02:37 PM2022-02-11T14:37:06+5:302022-02-11T14:58:25+5:30

किरीट सोमय्या यांच्यासोबत पुणे महानगरपालिका धक्काबुक्की झाली होती.

two policemen suspended in kirit somaiya attack case pmc crime news | किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई

किरीट सोमय्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई

googlenewsNext

पुणे: पुणे महापालिकेच्या आवारात मागील आठवाड्यात भाजप नेते किरीट सोमय्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. आता या प्रकरणात दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन पोलिसांना या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. आज सोमय्या (kirit somaiya) पुणे दौऱ्यावर आहेत.

शनिवारी किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेत आले होते. यावेळी शिवसेनेचे काही पदाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी पुढे आले. परंतु यातूनच त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्की झाले. या सर्व झटापटीत किरीट सोमय्या  पायर्‍यांवरुन खाली कोसळले आणि त्यांना जबर दुखापत झाली. संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या सर्व घटनेनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून 60 ते 70 शिवसैनिकांनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करत गृहसचिव यांना याबाबत पत्र लिहिलं होतं. तसेच राज्यपालांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं.

Web Title: two policemen suspended in kirit somaiya attack case pmc crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.