शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दोन तासात बदलली नगर परिषदेची रंग उडालेली अक्षरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:12 IST

बारामती : बारामती नगर परिषदेच्या इमारतीवर ‘बारामती नगर परिषद’ या अक्षरांचा रंग उडाल्याचे पाहून संतापलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार ...

बारामती : बारामती नगर परिषदेच्या इमारतीवर ‘बारामती नगर परिषद’ या अक्षरांचा रंग उडाल्याचे पाहून संतापलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना तातडीने ही अक्षरे बदलण्याची सूचना केली. दोन तासात रंग उडालेली अक्षरे बदला. मी पुन्हा दोन तासाने पुन्हा येऊन झालेला बदल पाहणार असल्याचे सांगायला पवार विसरले नाहीत. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. अवघ्या दोन तासात ‘बारामती नगर परिषदे’ची नवीन अक्षरे लावण्यात आली. जुनी रंग उडालेली अक्षरे बदलून नवीन रंगीत ‘नाव’ लावेपर्यंत नगर परिषद अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी थांबून होते.

शनिवारी (दि २५) सकाळी बारामती नगर परिषदेच्या सोलर प्रकल्पाचे भल्या सकाळी उद्घाटन झाले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शहरात लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सबाबत कडक धोरणाचा अवलंब करण्याची सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी पवार यांनी नगर परिषद पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत कडक सूचना दिल्या. शहराच्या सुशोभिकरणात बाधा आणणाऱ्या बाबी निदर्शनास आल्याने उपमुख्यमंत्र्यांचा पारा चढला. त्यामुळे उपस्थितांची तारांबळ उडाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही फ्लेक्स पाहिल्याने याबाबत कडक धोरण अवलंबण्याची सुचना केली. याबाबत कोणालाही दयामाया दाखवू नका,अगदी अजित पवार असेल तरी गुन्हा दाखल करा. नगरसेवकाने लावल्यास नगरसेवक पद घालवा. शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अजित पवार तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

पाऊण तास आधीच सकाली ६.३० लाच पोहचले

उपमुख्यमंत्री पवार यांनी पहाटे ५.३० वाजल्यापासून एसटी बसस्थानक, कऱ्हा नदी, निरा डावा सुशोभिकरणाच्या पाहणी केली. त्यानंतर निरा डावा कालव्याची पाहणी करीत पवार पायीच नगरपालिकेत पोहचले. नियोजित कार्यक्रम ७.१५ वाजता होता. मात्र, पवार त्यापूर्वी सुमारे पाऊण तास अगोदर ६.३० लाच पोहचले.

फोटो ओेळी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर रंग उडालेली ‘बारामती नगर परिषद’नावाची अक्षरे तातडीने बदलण्यात आली.

२५०९२०२१ बारामती—०२