पैसे मागितल्याने दोन गुंडांचा पाणीपुरीचालकावर चाकू हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 20:42 IST2023-01-30T20:42:33+5:302023-01-30T20:42:43+5:30

पाणीपुरीचालकाच्या कोपऱ्यावर व दंडावर वार करुन गंभीर जखमी केले

Two goons attacked Panipuri driver with knife for demanding money | पैसे मागितल्याने दोन गुंडांचा पाणीपुरीचालकावर चाकू हल्ला

पैसे मागितल्याने दोन गुंडांचा पाणीपुरीचालकावर चाकू हल्ला

पुणे : पाणी पुरी खाल्ल्यानंतर पैसे मागितल्याने दोघा गुंडाने पाणीपुरी चालकावर चाकूने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारवाड्यासमोरील पाणीपुरी स्टॉलवर शनिवारी रात्री पावणे आठ वाजता घडला. याप्रकरणी राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा शिवाजी रोडवर शनिवारवाड्यासमोर पाणीपुरीचा स्टॉल आहे. शनिवारी रात्री रिक्षातून दोघे जण अचानक आले. त्यांनी फिर्यादी यांना पाणी पुरी खिला, तू अपने भाई को बुला असे म्हणाले. फिर्यादी यांनी त्यांना पाणीपुरी खाण्यास दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यास पाणीपुरीचे पैसे मागितले असता त्यांचा राग येऊन त्यांनी खिशातून चाकू काढला. फिर्यादी यांच्या कोपऱ्यावर व दंडावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. दुसऱ्याने त्यांना हाताने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: Two goons attacked Panipuri driver with knife for demanding money