लोणावळ्याजवळ दोन अपघातात तिघांचा मृत्यू; 1 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 22:57 IST2018-12-14T22:55:32+5:302018-12-14T22:57:01+5:30

दोन दुचाकीस्वार आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू

two dead one critically injured in two accidents at lonavala | लोणावळ्याजवळ दोन अपघातात तिघांचा मृत्यू; 1 गंभीर जखमी

लोणावळ्याजवळ दोन अपघातात तिघांचा मृत्यू; 1 गंभीर जखमी

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्गावर झालेल्या दोन अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज सायंकाळी सात वाजता द्रुतगती महामार्गावर मळवलीजवळ पहिला अपघात झाला. तर राष्ट्रीय महामार्गावर पावणेदहा वाजता वाकसई फाट्याजवळ दुसरा अपघात झाला.

द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात एका पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तर राष्ट्रीय महामार्गावर वाकसई फाट्याजवळील गोविंदा हॉटेल समोर छेद रस्त्यावरुन वळणार्‍या दुचाकीला अज्ञात वाहनांची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Web Title: two dead one critically injured in two accidents at lonavala