दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात; संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू, 15 जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 10:23 AM2019-11-19T10:23:18+5:302019-11-19T10:51:02+5:30

दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात झाला आहे. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.

two dead and 15 injured in accident near pune | दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात; संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू, 15 जण जखमी 

दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात; संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू, 15 जण जखमी 

googlenewsNext
ठळक मुद्देदिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात झाला आहे. अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर हडपसरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पुणे - दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात झाला आहे. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर हडपसरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जीसीबी दिंडीत घुसल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 

पंढरपूर ते आळंदी वारी करणाऱ्या दिंडीला सासवड जवळील दिवे घाटात अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 2 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून 15 वारकरी जखमी झाले आहेत. जखमींवर हडपसर येथील नोबेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी (19 नोव्हेंबर) सकाळी 8.30 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली. सोपान महाराज नामदास (वय 36) आणि अतुल महाराज आळशी (वय 24) अशी मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. यातील सोपान महाराज नामदास हे संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संत नामदेव पालखी सोहळ्याची दिंडी प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूर ते आळंदी प्रवास करत होती. यावेळी आळंदीकडे येत असताना दिवे घाटात हा अपघात झाला. घाटात दिंडी उतरत असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जेसीबीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि जेसीबी थेट दिंडीत घुसला. काही क्षणात आरडाओरडा झाला मात्र या सुन्न करणाऱ्या अपघातात दोन वारकऱ्यांना नाहक जीव गमवावा लागला. या अपघातात 15 वारकरी जखमी असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
 

Web Title: two dead and 15 injured in accident near pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.