राज्यात दोन दिवस जाेरदार पावसाचे; कोकण अन् मध्य महाराष्ट्राला तडाखा बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 06:42 AM2022-08-10T06:42:14+5:302022-08-10T06:42:22+5:30

कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. 

Two days of heavy rain in the state; Konkan and Madhya Maharashtra are likely to be affected | राज्यात दोन दिवस जाेरदार पावसाचे; कोकण अन् मध्य महाराष्ट्राला तडाखा बसण्याची शक्यता

राज्यात दोन दिवस जाेरदार पावसाचे; कोकण अन् मध्य महाराष्ट्राला तडाखा बसण्याची शक्यता

Next

पुणे/मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. पुढील दोन दिवस पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज, तर गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. 

या जिल्ह्यांत पावसाचा जोर 

बुधवारी पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे, तसेच कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी व मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

३३४ मिमी पाऊस, लांजा येथे सर्वाधिक

राज्यातील सर्वाधिक पाऊस लांजा येथे ३३४ मिमी पडला. कोकणात अन्यत्र झालेला पाऊस मिमीमध्ये : तळा २१०, म्हसला १८८, मंडणगड १७०, माणगाव १६३, संगमेश्वर १४४, रत्नागिरी १३३, दापोली १२८.मध्य महाराष्ट्रात राधानगरी १९७, महाबळेश्वर १९२, गगनबावडा १७७, शाहूवाडी १४५, लोणावळा १३६, चंदगड ११५, तर विदर्भात ब्रह्मपुरी २२३, भंडारा १४०, सडक अर्जुनी १०३ व वाशिम येथे १०० मिमी पाऊस.

 

Web Title: Two days of heavy rain in the state; Konkan and Madhya Maharashtra are likely to be affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.