शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पुण्यात दोन दृष्टिहीन विद्यार्थ्यांना बसने उडवले; दोघेही गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 4:22 PM

दोघे विद्यार्थी उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल

पुणे : एनडीए गेट ते पुणे स्टेशन मार्गावरील पीएमपी बसने गरवारे महाविद्यालयासमोर दोन दृष्टिहीन विद्यार्थ्यांना धडक दिली. या अपघातात दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयुरी गरुडे आणि वैभव क्षीरसागर अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांची नावे आहेत. दरम्यान अपघातानंतर लगचेच अँब्युलन्स हेल्प रायडर्सच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, मयुरीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

मयुरी बीए प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असून, वैभव एमए प्रथम वर्षात आहे. मंगळवारी सकाळी साडेअकरा ते पावणे बाराच्या सुमारास गरवारे महाविद्यालयातून मयुरी आणि वैभव महाविद्यालयातून बाहेर पडत डेक्कन कॉर्नरकडे पायी जात होते. दरम्यान सीएनजी ८६८ क्रमांकाच्या पीएमपीच्या बसने त्यांना पाठीमागून धडक दिली. पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बसच्या उजव्या बाजूने एक चारचाकी ओव्हरटेक करत होती, तर चालकाला हे दोघे विद्यार्थी दृष्टिहीन असल्याचे लक्षात आले नाही. शिवदास काळे हे पीएमपी बस चालवत होते.

हातात स्टिक नसल्याने समजले नाही..

दरम्यान चालक शिवदास काळेने पीएमपी प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार मयुरी आणि वैभव फुटपाथवरून न चालता रस्त्यावरून चालत होते. तसेच त्यांच्या हातात स्टिक (काठी) नसल्याने ते दृष्टिहीन असल्याचे समजले नाही, असे सांगितले. असे असले तरी पीएमपी प्रशासनाने झालेली घटना दुर्दैवी असून, दोन्ही अपघातग्रस्त विद्यार्थ्यांचा संपूर्ण उपचार पीएमपी प्रशासन करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

हेल्प राडर्सचे सदस्य मदतीला..

अपघात घडला त्यावेळी हेल्प राडयर्सचे संतोष पोळ हे त्यांच्या आईला घेऊन रुग्णालयात जात होते. अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी त्यांच्या इतर ग्रुपच्या सदस्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर भारत मिसाळ आणि अजित जाधव या दोन हेल्प रायडर्सच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत, जखमी अवस्थेत दोघांनाही सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. यावेळी गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख आणि त्यांच्या मित्रांनी देखील रुग्णालयात धाव घेतली.

चालक तर डोळस होता..

झालेला अपघात हा गंभीर आहे. आधीच दृष्टीहीन त्यात या वयात अशाप्रकारे अपघात होते ही वाईट घटना आहे. मुळात फुटपाथवरून डोळस लोकांना चालताना त्रास होतो. शहरातील कोणतेही फुटपाथ अंध व्यक्तीला चालण्यासारखे नाहीत. फुटपाथवर बसलेले विक्रेते, दुकांनांचे बोर्ड, खांब या अडथळ्यांमुळे धडकून अंध व्यक्ती जखमी होतात. त्यामुळे ते रस्त्यावरून चालण्याचा निर्णय घेतात. हातात स्टिक असणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्याकडे नव्हती असे म्हटले जात असेल तर पीएमपीचा चालक तर डोळस होता ना. त्याने बस जागेवर थांबवणे गरजेचे होते. आज पुण्यातील लोकांची आम्हा अंध व्यक्तींबद्दलची सहानुभूती कमी होताना दिसत आहे. यासाठी जागरूकता होणे गरजेचे आहे. - राहुल देशमुख, संस्थापक अध्यक्ष, नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड

‘लोकमत’चे पीएमपी आणि मनपा प्रशासनाला प्रश्न..

१) दोघे विद्यार्थी दृष्टिहीन होते हे खरे आहे, मात्र पीएमपी चालकाने बस जागेवरच का थांबवली नाही ?२) गर्दीची वेळ असल्याने तसेच महामार्ग नसतानाही बसचा वेग अपघातावेळी किती होता ?३) दृष्टिहीन व्यक्तींना चालण्यासाठी फुटपाथ योग्य नसतील तर त्यांनी नेमके चालायचे कुठून ?४) फुटपाथवरील विक्रेते, दुकानांचे बोर्ड कधी हटवणार ?५) गरवारे महाविद्यालयासमोर मेट्रो स्टेशन होण्याआधी रस्ता ओलांडणे सोपे होते, मेट्रो स्टेशन उभारल्यानंतर मात्र पायी चालणाऱ्यांना वळसा मारावा लागतो. तसेच याठिकाणी पूर्वी असलेले झेब्रा क्रॉसिंग देखील अस्तित्वात राहिलेले नाही ही जबाबदारी नेमकी कोणाची ?

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलAccidentअपघातhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस