शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

दोन दुचाकीचे हँडल एकमेकात अडकले; मागून इकोची धडक, शिक्षकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:35 IST

इको गाडीची जबरदस्त धडक बसल्याने शिक्षक हे दुसऱ्या मोटरसायकलवर पडून डांबरी रस्त्यावर कोसळले, त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर जखमा होऊन मृत्यू झाला

मंचर: दोन दुचाकी वाहने व इको गाडीच्या विचित्र अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. हा अपघातमंचर घोडेगाव रस्त्यावर निघोटवाडी गावच्या हद्दीत चिंचपुरमळा येथे आज दुपारी बारा वाजता झाला. अजय मनोहर आढळराव पाटील(वय 32 रा. लांडेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून प्रतीक कोकरे हा जखमी झाला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक असलेले अजय मनोहर आढळराव हे मंचर येथील बँकेतील काम करून दुचाकीवरून मंचर बाजूकडून लांडेवाडीकडे चालले होते. मंचर घोडेगाव रस्त्यावर निघोटवाडी गावच्या हद्दीत चिंचपुरमळा येथे दुचाकीच्या शेजारी दुसरी दुचाकी आली. प्रतीक कोकरे ती चालवत होता. दोन्ही दुचाकीचे हँडल जवळ आल्याने एकमेकात अडकले. त्याचवेळी समोरून घोडेगाव बाजूकडून इको गाडीची धडक दोन्ही मोटरसायकलला बसली. इको गाडीची जबरदस्त धडक बसल्याने अजय आढळराव हे दुसऱ्या मोटरसायकलवर पडून डांबरी रस्त्यावर कोसळले. त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या. तर  दुसऱ्या दुचाकीवरील प्रतीक कोकरे हे सुद्धा जखमी झाले. आढळराव यांच्या दुचाकीचा चक्काचूर होऊन मागील चाक सुद्धा निखळले. 

जखमी अवस्थेत दोघांनाही तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी अजय आढळराव हा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर प्रतीक कोकरे याच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी अविनाश तानाजी आढळराव यांनी फिर्यादी दिल्यानंतर इको गाडीचा चालक लालचंद दुर्गाप्रसाद गुप्ता (रा. घोडेगाव) याच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या अजय आढळराव व त्याची पत्नी हे दोघेही मंचर येथील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, बहीण व तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे. अजय आढळराव पाटील यांच्या अपघाती निधनाने लांडेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. लांडेवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष खंडेराव तात्या आढळराव पाटील यांचा अजय हा पुतण्या होता. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातMancharमंचरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकDeathमृत्यू