एटीएम मशिन चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:10+5:302021-07-20T04:09:10+5:30

सोनू ऊर्फ शुभम दिलीप गायकवाड (वय २१, रा. गोलेगाव ता. शिरूर), मंगेश काळुराम गाडेकर (वय २४, रा. मारुती आळी, ...

Two arrested for trying to steal ATM machine | एटीएम मशिन चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

एटीएम मशिन चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

सोनू ऊर्फ शुभम दिलीप गायकवाड (वय २१, रा. गोलेगाव ता. शिरूर), मंगेश काळुराम गाडेकर (वय २४, रा. मारुती आळी, शिरूर) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बाबूरावरनगर परिसरात एका बँकेचे एटीएम असून ७ जुलैला पहाटे चारचाकी वाहनांच्या मदतीने दोरखंड वापरून हे एटीएम तोडून चोरून नेण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनेही या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यास सुरुवात केली होती. शुभम गायकवाड याने साथीदारांच्या मदतीने एटीएम चोरीचा प्रयत्न केली असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांचा पोलिसांनी शोधही घेतला. परंतु ते मिळून येत नव्हते. दरम्यान, शुभम आणि मंगेश गाडेकर हे दोघे शहरातील निर्माण प्लाझा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. तसेच यामध्ये अन्य महेश सुरेश गुंजाळ, निशांत पंडित साळवे (दोघे रा. गोलेगाव ता. शिरूर) यांनी मदत केल्याचे सांगितले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस हवालदार जनार्धन शेळके, राजू मोमीन, पोलीस नाईक मंगेश थिगळे, अजित भुजबळ, अक्षय जावळे आदी कर्मचाऱ्यांनी केली.

१९ शिरूर

एटीएम चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांसमवेत पोलीस.

Web Title: Two arrested for trying to steal ATM machine