शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार', खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याचे काम वेगाने सुरू, १ किलोमीटर काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 10:32 IST

खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान ३४ किलोमीटर लांबीपैकी २८ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे

पुणे : खडकवासला धरणाच्या कालव्यातील पाण्याची गळती, चोरी, जलप्रदूषण व बाष्पीभवन रोखण्यासाठी खडकवासला धरण ते फुरसुंगी यादरम्यान बोगद्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. खडकवासला, धायरी, वडाचीवाडी आणि उरुळी देवाची अशा चार ठिकाणी एकाच वेळी चार टनेल बेअरिंग मशीनच्या माध्यमातून (बुमर) बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे एक किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. एका बुमरच्या माध्यमातून दिवसामध्ये आठ मीटर बोगद्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे. आणखी तीन ठिकाणांहून लवकरच कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान ३४ किलोमीटर लांबीपैकी २८ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २२०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने १६०० कोटी रुपयांच्या कामांसाठीची निविदा काढली होती. त्यानुसार या बोगद्याचे काम ‘मेघा इंजिनिअर्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. तर अतिरिक्त ३ हजार ४७२ हेक्टरवरील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्याप्रमाणे जलप्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडून मान्यता मिळाल्याने जागेवर कामाला सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी या कामास सुरुवात झाली असून आतापर्यंत एक किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत तीन वर्षांची असणार आहे.बुमर मशीनच्या साहाय्याने ६.३ डायमीटर ‘डी’ आकाराचा बोगदा खोदण्यात येत आहे. काम गतीने होण्यासाठी एकाच वेळी चार ठिकाणांहून बोगदा खोदण्यात येत आहे. लवकरच कात्रज, वडकी आणि लोणी काळभोर येथूनही बोगद्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सुमारे २८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा असणार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर त्यातून प्रतिसेकंद ४१ क्युसेक (क्युबिक मीटर) पाणी सोडण्यात येणार आहे. तर धरणाच्या भिंतीपासून मागील बाजूस ९० मीटर अंतरावर आणि जलाशयाच्या खालील बाजूस १८ मीटर खोलीवरून हा बोगदा जाणार आहे. त्यामुळे पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. परिणामी पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Khडकवासला-Fursungi Tunnel: Water Saving Project Progresses Rapidly, One Kilometer Completed

Web Summary : The Khadakwasla-Fursungi tunnel project, aiming to save water and boost irrigation, is progressing rapidly. One kilometer of the 34-kilometer tunnel is complete. The project uses tunnel boring machines at four locations, with more sites planned for the ₹2200 crore initiative.
टॅग्स :PuneपुणेriverनदीDamधरणMONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारWaterपाणी