शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हिंग स्कूल अडचणीत

By admin | Updated: March 20, 2015 01:12 IST

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मान्यतेने खासगी वाहनचालक प्रशिक्षण संस्था (मोटार ड्रायव्हिंग स्कूल) सुरू करण्यासाठीचे निकष बदलले आहेत.

पिंपरी : प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मान्यतेने खासगी वाहनचालक प्रशिक्षण संस्था (मोटार ड्रायव्हिंग स्कूल) सुरू करण्यासाठीचे निकष बदलले आहेत. नव्या नियमावलीनुसार खासगी वाहन चालक प्रशिक्षण संस्था सुरू ठेवणे कठीण होऊ लागल्याने पुणे, पिंपरी -चिंचवडमधील अनेक वाहन चालक प्रशिक्षण संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पिंपरी चिंचवडमधील १३० पैकी ३० संस्थांनी अद्यापपर्यंत गाशा गुंडाळला आहे. आतापर्यंत प्रादेशिक परिवहन अथवा आरटीओ वावरणाऱ्या दलांलामार्फत सहज वाहन चालविण्याचा परवाना मिळविता येत होता. परिवहन आयुक्तपदी रूजू होताच महेश झगडे यांनी आरटीओतील दलाल हटविण्याची मोहिम हाती घेतली. काही ठिकाणी वाहन चालक प्रशिक्षण संस्थाचालक दलाल म्हणुन काम करीत होते. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास येणाऱ्यांना वाहनचालक परवाना मिळवून देण्यापर्यंतची कामे त्यांच्यामार्फत केली जात होती. अलिकडच्या काळात शिकाऊ परवान्यासाठीही दोन महिने आगोदर ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेट’ घेणे बंधनकारक केले आहे. वाहनचालविण्याचे परवाने पोस्टाद्वारे घरपोच देण्याचे धोरण अवलंबले गेले. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना वाहन चालविण्याचा परवाना मिळवून देण्याची प्रशिक्षण संस्थांचालक आता हमी देऊ शकत नाहित. शासनाने वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन केंद्र (आयडीटीआर) हे प्रशिक्षण आणि चाचणी केंद्र सुरू केले आहे. त्या ठिकाणी अत्याधुनिक ‘ट्रॅक’वर वाहनचालकाला चाचणी द्यावी लागते. त्यामुळे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना शिकविण्याचा मोबदला मिळणेही कठीण झाले आहे. शहरातीलवाहन चालविण्याचे प्रशिक्षणदेणाऱ्या खासगी संस्था अडचणीत आल्या आहेत.