शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

समायोजनासाठी शिक्षकांमध्ये तू-तू, मैं-मैं

By admin | Updated: October 20, 2015 03:05 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक समायोजन सुरू असल्याची कुणकूण लागताच तू-तू मैं-मैं सुरू झाली आहे. डीएड सीइटी २0१0 पुनर्मूल्यांकन प्राप्त उमेदवारांची पडताळणी करण्यात

पुणे : जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक समायोजन सुरू असल्याची कुणकूण लागताच तू-तूमैं-मैं सुरू झाली आहे. डीएड सीइटी २0१0 पुनर्मूल्यांकन प्राप्त उमेदवारांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे समजताच इतर जिल्ह्यात असलेल्या अनु.जमातीतील शिक्षकांनी पुणे जिल्हा परिषदेत प्रथम आम्हाला सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे.पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात ५ हजार २९३ शाळा असून, येथे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व उपशिक्षकांच्या सुमारे ५०० जागा रिक्त आहेत. मात्र, सध्या बिंदूनामावलीचे काम सुरू आहे. ते पूर्ण होईपर्यंत या जागा भरता येत नाहीत. डीएड सीईटी २0१0 पुनर्मूल्यांकन प्राप्त उमेदवारांनी जिल्हा परिषदेत नियुक्त्या मिळाव्यात, यासाठी चार दिवस उपोषण केले होते. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना आस्थापना दिल्या व नियुक्तीसाठी याद्या करून संबंधित जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवले. मात्र, बिंदूनामावलीमुळे त्यांचे समायोजन झाले नाही. बिंदूनामावलीचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर समायोजन करू, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, त्याला सहा महिने होऊनही ती प्रक्रिया पुढे जात नसल्याने या विद्यार्र्थ्यांनी न्यायालयात १५ दिवसांपूर्वी अवमान याचिका दाखल केली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले आहे. ही कुणकुण लागताच महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे व मुख्याधिकारी कांतिलाल उमाप यांची भेट घेतली. आंतरजिल्हा बदलीने इतर जिल्ह्यातील अनु. जमातीतील शिक्षकांना नाहरकत पत्र देऊन तत्काळ सामावून घ्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने येणारे शिक्षक व सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये तू-तू मैं-मैं सुरू झाली आहे. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी मात्र बिंदूनामावलीशिवाय आम्ही काहीही निर्णय घेऊ शकत नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)