शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक विवाह म्हणजे सामाजिक क्रांती; विवेक, समता अन् सुधारणांचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:17 IST

'लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा मिलाप नाही, तर दोन विचारधारांचा, समानतेचा आणि विश्वासाचा बंध आहे', हे सांगणारे आणि जगणारे अनेक तरुण आता सत्यशोधक विवाह पद्धतीकडे वळताना दिसत आहेत.

- उजमा शेखपुणे : सध्याच्या काळात विवाह सोहळे मोठ्या प्रमाणावर खर्च, दिखावा आणि जातीधर्माच्या बंधनात अडकलेले दिसतात. मात्र या पार्श्वभूमीवर 'सत्यशोधक विवाह' हे समाजात समतेचा, विज्ञाननिष्ठ विचाराचा आणि परिवर्तनाचा एक आदर्श विवाह म्हणून समोर येत आहे. 'लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा मिलाप नाही, तर दोन विचारधारांचा, समानतेचा आणि विश्वासाचा बंध आहे', हे सांगणारे आणि जगणारे अनेक तरुण आता सत्यशोधक विवाह पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. महात्मा जोतिराव फुले यांनी १९ व्या शतकात या सत्यशोधक विवाह पद्धतीची सुरुवात केली. यामध्ये ब्राह्मण पुजाऱ्यांशिवाय, धार्मिक विधींविना दोघा वधू-वरांनी समाजासमोर परस्पर संमतीने विवाह करणे हा मुख्य गाभा आहे.

अंधश्रद्धा, जातिभेद आणि अवास्तव खर्च टाळणारी ही विवाहपद्धत, समाजसुधारणेच्या दिशेने उचललेले एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या पद्धतीचा पाया घातला आणि स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांना बळ दिले. सत्यशोधक विवाहातून कोणताही धार्मिक विधी, मंत्रपठण, ब्राह्मण वर्चस्व किंवा हुंडा नसतो. वधू-वर एकमेकांच्या समोर उभे राहून, प्रेम, सहजीवन, जबाबदारी आणि महात्मा जोतिराव फुले यांनी तयार केलेल्या समतेच्या मंगलाष्टक म्हणतात.हुंड्याला ठाम नकारसत्यशोधक समाजाची लग्न परंपरा हा हूंडाविरोधी चळवळीचा मजबूत भाग ठरली आहे. या विवाहात हुंडा घेणे किंवा देणे पूर्णतः निषिद्ध आहे. दोन्ही कुटुंबांतही याचे पालन होत असल्याने अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक दडपणाविना लग्न लावणे शक्य होते.

सामाजिक बदलाचा भागसत्यशोधक विवाह केवळ विधी नाही, ती एक सामाजिक क्रांती आहे. या पद्धतीने विवाह करणारे जोडपे समाजात विचारप्रवृत्त चर्चा घडवून आणते. खर्च, दागदागिने, सजावट, वरात, जेवणावळी यांचा अतिरेक न करता, अत्यंत साध्या पद्धतीने विवाह होतो.

सत्यशोधक विवाहाच्या माध्यमातून अनेक जातीय आंतरजातीय विवाह लावण्यात येतात. सत्यशोधक विवाह केवळ विधी नाही. हा विवाह पुजारीविना, धार्मिक विधीविना अन् हुंडाविना पार पडतो. सत्यशोधक विवाह पद्धत सामूहिक पातळीवर झाली पाहिजे.  -  प्रा. प्रतिमा परदेशी, अध्यक्ष सत्यशोधक प्रबोधन महासभा  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmarriageलग्न