शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या दुचाकी नेणारा ट्रक पकडला

By admin | Updated: April 4, 2015 06:04 IST

शहराच्या विविध भागांमधून दुचाकींची चोरी करून या दुचाकींची कर्नाटकात विक्री करणाऱ्या टोळीचा चतु:शृंंगी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

पुणे : शहराच्या विविध भागांमधून दुचाकींची चोरी करून या दुचाकींची कर्नाटकात विक्री करणाऱ्या टोळीचा चतु:शृंंगी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका ट्रकमध्ये भरून कर्नाटककडे नेल्या जात असलेल्या दहा दुचाकी ट्रकसह पोलिसांनी पकडल्या आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.सुधीर बसण्णा सुतके (वय २३, रा. काळाखडक, वाकड), महानतेश बसंतराम गतरगी (वय २४, रा. इंगळगी, गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक आरोपींची नावे आहेत. चोरीच्या दुचाकी घेऊन एक ट्रक बाणेर रस्त्यावरील महाबळेश्वर चौकामधून कर्नाटककडे जाणार असल्याची माहिती तपास पथकाचे उपनिरीक्षक राजाराम चौहान यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त डी. जी. वाळुंजकर, पोलीस निरीक्षक सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर रस्त्यावर सापळा लावण्यात आला. एका ट्रकवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला थांबवले. पोलिसांनी ट्रकमधील सामानाबाबत माहिती विचारली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळे पोलिसांनी ट्रकची झडती घेतली. ट्रकमध्ये सिमेंटची रिकामी पोती भरलेली होती. या पोत्यांच्या खाली दहा मोटरसायकली आढळून आल्या. सुधीर सुतके याच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वी अटकही झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. ही कारवाई उपनिरीक्षक राजाराम चौहाण, तुषार पाचपुते, पोलीस कर्मचारी बाळू गायकवाड, संजय शिंदे, शरद पाटील, संजय वाघ, चेतन गोरे, प्रवीण पाटील, विजय मोरे, जाधव, दिलीप गोरे यांनी केली.