शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ भीषण अपघात; फळ विक्रेत्याच्या अंगावर पडला ट्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 20:47 IST

लहान मुले गंभीर जखमी असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचेवर प्राथमिक उपचार करीत अकलुजला पुढील उपचारासाठी पाठविले आहे...

बाभुळगाव(पुणे): इंदापूर नगरपरिषद हद्दीतील बाह्यवळण मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक गतिरोधकावर आदळल्याने पाटे तुटले. यामध्ये चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला फळ विक्रेत्याच्या अंगावर गेल्याने अपघात झाला. या अपघातात फळ विक्रेत्या महिलेसह दोन लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक भिमाई आश्रम शाळेनजिक शिंदे वस्ती चौक येथे गतीरोधकावर आदळला. शुक्रवारी सायंकाळी ५:१५ च्या  सुमारास अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिंवडीवरून तुळजापूर येथे देव दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस इंदापूर बाह्यवळन महामार्गालगत चहापानासाठी थांबली होती. बसमधील दोन लहानमुले ही शेजारी विक्रेत्याकडून पेरू विकत घेत होते. याचवेळी गतीरोधकावर आदळून पाटे तुटून अपघात झाला. यामध्ये ही मुले गंभीर जखमी झाली.

अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अपघातग्रस्तांना  खासगी वाहनातून आणत उपचारासाठी  उपजिल्हा रूग्णांलयात दाखल केले. लहान मुले गंभीर जखमी असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचेवर प्राथमिक उपचार करीत अकलुजला पुढील उपचारासाठी पाठविले आहे. अधिक तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाअपघातात गंभीर जखमी झालेल्या लहान मुलांना उपजिल्हा रूग्णांलयात दाखल करण्यात आले. यावेळी  कामावर असणारे डॉ. नामदेव गार्डे हे जखमी रूग्णांजवळ आले. त्यांनी रूग्णांची पाहणी करत असताना त्यांना फोन आला. त्यानंतर डॉ. गार्डे हे लगेच तेथून निघून गेले. त्यानंतर अर्ध्या तासाने ते परत दवाखान्यात आले. त्यानंतरच  जखमींवर उपचार केले.

डॉ.गार्डे यांचा खासगी दवाखाना उपजिल्हा रूग्णालयासमोर आहे. ते सरकारी दवाखान्यात सेवा बजावताना त्यांचा स्वत:चा खासगी दवाखानाही चालवतात. त्यांचे स्वत:च्या दवाखान्यात अधिक लक्ष असल्याचे दिसून आले. परिणामी उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNational Highwayराष्ट्रीय महामार्गIndapurइंदापूरSolapurसोलापूरAccidentअपघात